SSC JE Recruitment Notification 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


कर्मचारी निवड आयोगानं (SSC) नुकतीच विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत ज्यूनियर इंजिनीयरसाठीच्या सिव्हिल, मॅकॅनिक, इलेक्ट्रिकल, क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉटँक्ट्स या पदांवर भरती करण्यात येणार आबहे. 12 ऑगस्ट 2022 पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. यासाठी उमेदवाराला ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे. 


एसएससी विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेच्य माध्यमातून बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, सेंट्रल वॉटर कमिशन आणि मिलेट्री इंजीनियर सर्व्हिस यासह इतर विभागांमध्ये सिव्हिल, मॅकॅनिक, इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये विविध ज्यूनियर इंजिनीयर म्हणजेच कनिष्ठ अभियंता पदांवर उमेदवारांची भरती केली जाईल. 


महत्त्वाच्या तारखा



  • ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची सुरुवात तारीख : 12 ऑगस्ट 2022

  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2022


शैक्षणिक पात्रता


या भरती प्रक्रियेत ज्यूनियर इंजिनीयर पदांवर संबंधित ट्रेडमध्ये इंजिनियरिंगची पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेले इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. यासंबंधित अधित माहितीसाठी उमेदवाराने अधिकृत अधिसूचना वाचावी.


वयोमर्यादा


या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 30 ते 32 वर्ष या दरम्यान असावं. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाईल. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांनी पाच वर्षांची सूट असेल, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट असेल. 


कशी असेल निवड प्रक्रिया?


या पदांवर परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पेपर-I (CBT) आणि पेपर-II मधील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. पेपर-1 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पेपर-2 साठी परीक्षा देता येईल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल.


पगाराचा तपशील 


ज्यूनियर इंजिनीयर म्हणजेच कनिष्ठ अभियंता पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये ते 1 लाख 12,400 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.


अर्जाची फी


सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच SC, ST, दिव्यांग वर्ग आणि सर्व वर्गातील महिलांना शुल्क भरावं लागणार नाही.