IBPS PO Mains Result 2022: आयबीपीएस मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) प्रोबेशनर ऑफिसरच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ibps.in या मुख्य संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांना याची माहिती मिळणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर ibps.in या परीक्षेचा निकाल पाच जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत उपलब्ध असेल. निकालाबाबात सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षार्थ्यांनी खालील स्टेप फॉलो कराव्यात....
कसा कराल निकाल चेक -
सर्वात आधी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळ ibps.in यावर जा...
आता होम पेज वर उपलब्ध असलेल्या IBPS PO Mains Result 2022 या लिंकवर क्लिक करा...
त्यानंतर तुमचं लॉग इन डिटेल्स भरा...
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल....
समोर दिसणारा निकाल डाऊनलोड करा..
निकाल पाहण्यासाठी आयबीपीएसच्या येथे क्लिक करा
दरम्यान, आयबीपीएस (IBPS) मुख्य परीक्षाचं आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले होते. जानेवारीमध्ये निकाल लागला आहे. पास होणाऱ्या परीक्षार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
IBPS PO Interview कधी होणार?
प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षा पास होणाऱ्या उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. पात्र उमेदरांना जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये मुलाखतीला बोलण्यात येऊ शकतं. मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे. मुलाखतीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालासाठी आयबीपीएस संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याशिवाय याबाबत एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही वेळोवेळी माहिती दिली जाईल.
मुलाखतीनंतर कोणत्या जागांसाठीची मेरिट लिस्ट जारी होणार -
मुलाखतीनंतर एप्रिलमध्ये अंतिम निकाल जाहीर होणार आहे. बँक ऑफ इंडिया: 535 जागा, बँक ऑफ महाराष्ट्र: 500 जागा, कॅनरा बँक: 2500 जागा, पंजाब नॅशनल बँक पीएनबी: 500 जागा.... पंजाब अॅण्ड सिंध बँक: 253 जागा, युनियन बँक ऑफ इंडिया : 2094 जागा आणि यूको बँक: 550 जागा साठीची अंतिम यादी जाहीर होणार आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये मुख्य परीक्षा पास होणाऱ्या उमेदरांच्या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालासाठी आयबीपीएस संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याशिवाय याबाबत एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही वेळोवेळी माहिती दिली जाईल.
आणखी वाचा:
Job Majha : महावितरण आणि परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज
विद्यापीठं अन् महाविद्यालयांच्या परीक्षासंदर्भात महत्वाची बातमी...