IB ACIO Notification 2023: चित्रपट आणि अनेक वेबसीरीजमधून गुप्तचर विभाग कशा पद्धतीने काम करतं? हे आपण पाहतो. अनेकांचं या गुप्तचर विभागात म्हणजेच इंन्टेलिजन्स ब्युरोमध्ये काम करण्याचं स्वप्नही असतं. हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. केंद्रीय गुप्तचर विभागाअंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 च्या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 995 रिक्त असलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 25 नोव्हेंबरपासून अर्ज करता येईल.  Intelligence Bureau (IB) म्हणजेच गुप्तचर विभाग सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) ग्रेड-II कार्यकारी पदासाठी 996 रिक्त जागा भरत आहे. त्यासाठी अधिसूचना गृह मंत्रालयाकडून Ministry of Home Affairs (MHA) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. 


IB ACIO 2023 रिक्त जागा


IB कडे सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/ कार्यकारी पदांसाठी 995 रिक्त पदे खालीलप्रमाणे विविध श्रेणींमध्ये वितरीत केल्या आहेत. 



  • अनारक्षित (UR) - 377

  • अनुसूचित जाती (SC)- 134

  • अनुसूचित जमाती (ST)- 133

  • ओबीसी - 222

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS)-129


गृह मंत्रालय इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ACIO ग्रेड II कार्यकारी पदासाठी नियुक्ती करत आहे. उमेदवार खालील तक्त्यामध्ये IB ACIO 2023 संबंधी तपशील तपासू शकतात.




IB ACIO पात्रता निकष 2023


शैक्षणिक पात्रता


उमेदवार पदवीधर असावा


वयोमर्यादा


18 ते 27 वर्षे


IB ACIO भर्ती 2023 अर्ज कसा करावा?


पात्र उमेदवार गृह मंत्रालयाच्या (MHA) अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.



  • Step 1: एक नवीन खाते (account) तयार करा किंवा तुमच्या विद्यमान (existing) खात्यात लॉग इन करा

  • Step 2: सर्व आवश्यक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा

  • Step 3: आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा

  • Step 4: अर्ज फी भरा

  • Step 5:  अर्ज सबमिट करा


IB ACIO 2023 निवड प्रक्रिया


निवड प्रक्रियेत खालील टप्पे असतात 


IB ACIO भरतीसाठी निवड प्रक्रियेत साधारणपणे दोन टप्पे असतात


लेखी परीक्षा : परीक्षा 150 गुणांच्या दोन भागात घेतली जाईल - टिअर 1 आणि टिअर 2.


मुलाखत : लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावले जाते.


IB ACIO 2023 परीक्षेचा नमूना


परीक्षा दोन टप्प्यात विभागली जाते म्हणजे टिअर 1 आणि टिअर 2.


IB ACIO टिअर 1 परीक्षेचा नमुना


टियर 1 मध्ये 1/4 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल


इतर महत्वाच्या बातम्या