Enforcement Directorate : इन्फोर्समेंट डिक्टोरेट (ED) यालाच अंमलबजावणी संचालनालय असं देखील म्हणतात. कोणत्याही घोटाळ्यात छापेमारी असो किंवा कोणाला अटक करायची असो सर्वात पुढे नाव येते ते अंमलबजावणी संचालनालयाचेच. अशातच रोखठोक व्यक्तिमत्व, गुन्हगारीविरूद्ध लढा देण्याची वृत्ती आणि प्रचंड हजरजबाबीपणा असावा असं प्रत्येक तरूणाला वाटतं. तुम्हाला देखील ED मध्ये नोकरी करायची असेल आणि त्यासाठी पात्रता, शिक्षण काय असाव? ED ऑफिसरला पगार नेमका किती मिळतो याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच... 


ईडी बहुतेक पदांवर प्रति नियुक्तीच्या आधारावर भरती करते. त्यासाठी ईडी मार्फत वेळोवेळी पदांची भरतीही करण्यात येते. तशा जाहिरातीही प्रसिद्ध होतात.  


ईडीमध्ये भरती कशी करतात?


कर्मचारी निवड आयोग दरवर्षी एसएससी सीजीएल परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी केंद्रीय विभागांमध्ये भरती केली जाते. एसएससी सीजीएल परीक्षेद्वारे सहाय्यक ईडी अधिकाऱ्याच्या पदांची भरती केली जाते.


ईडीमध्ये नोकरीसाठी काय पात्रता असावी?


अंमलबजावणी संचालनालय (ED) मध्ये जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता असणं गरजेचं आहे. जसे की, तुमची शैक्षणिक पात्रता. यामध्ये तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवी असावी. तसेच, काही प्रमाणपत्र, स्पर्धा परीक्षांमधला सहभाग इ. पात्रता असणं गरजेचं आहे.


वयोमर्यादा किती असावी?


ईडीमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवाराचं वय 21 ते 30 या वयोगटातील असावं. शिवाय, या प्रतिष्ठित पदासाठी स्पर्धा करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी स्पर्धात्मक लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि काही प्रकरणांमध्ये, वैद्यकीय आणि फिटनेस टेस्ट घेतल्या जातात. यामध्ये तुम्ही पास होणं गरजेचं आहे.  


ईडीच्या पदासाठी कोण अर्ज करू शकतं?


असिस्टंट ईडी ऑफिसर पदांवर नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना SSC CGL साठी अर्ज करावा लागतो. तसेच, उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करावा लागतो. एसएसएसी यासाठी अधिसूचना जारी करते. असिस्टंट ईडी ऑफिसर पदांसाठी जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता पदवी पास असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे दरम्यान असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.


निवड कशी केली जाते?


सहाय्यक ईडी अधिकारी पदांसाठी निवड टियर 1 आणि टियर 2 परीक्षेद्वारे केली जाते. टियर 1 परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार टियर 2 परीक्षेसाठी पात्र ठरतात. आणि टियर 2 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होते आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते. निवडलेल्या उमेदवाराला दरमहा साधारण 44900 ते दीड लाखांच्या दरम्यान पगार दिला जातो. 


महत्त्वाच्या बातम्या :


ED Recruitment 2024 : ED मध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी, तब्बल दीड लाख पगार मिळणार; 'येथे' करा अर्ज