मुंबई : राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojana Doot) नावाने एक उपक्रम राबला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील 50 हजार तरुणांना योजनादूत म्हणून काम करण्याची संधी आहे. या उपक्रमाअंतर्गत सरकारतर्फे प्रतिमहिना 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे मानधन सहा महिन्यांसाठी असेल. याच उपक्रमात तुम्हाला भाग घ्यायचा असेल, सरकारचा योजनादूत व्हायचे असेल तर त्यासाठी अर्ज कुठे करावा? कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे? योजनादूत होण्यासाठीच्या अटी काय आहेत? हे जाणून घेऊ या...


योजनादूत म्हणजे नेमकं काय? 


समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या उत्थानासाठी राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. याच योजनांचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा म्हणून सरकारतर्फे प्रयत्न केला जातो. म्हणजेच या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  प्रयत्न केले जातात. या योजनांची माहिती रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी यावर काम करणे गरजेचे आहे. याच कामाची जबाबदारी योजनादूंतावर सोपवली जाणार आहे. राज्यातल्या विविध योजनांची माहिती सामन्य जनतेला देणे, हे या योजनादूतांचं काम असेल. या कामासाठी योजनादूतांना प्रतिमहा 10000 हजार रुपये दिले जातील. सहा महिन्यांसाठी ही रक्कम मिळेल.


योजनादूत होण्याची अटक काय ?


योजनादूत होण्यासाठी संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. यासह उमेदवाराचे वय 18 ते 35 असणे गरजेचे आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. 


कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?


योजनादूत होण्यासाठी तुम्हाला अगोद विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैयक्कित बँक खात्याचा तपशील, अशी माहिती असणे गरजेचे आहे. 


अर्ज कुठे करावा? 


योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला http://mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. 


हेही वाचा :


National Exit Test : मोठी बातमी! आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा' 


शिक्षण फक्त 12, पगार तब्बल 70000! 'या' खात्यात सरकारी नोकर होण्याची संधी; जाणून घ्या A टू Z माहिती


10 वी पास तरुणाला थेट पर्मनंट सरकारी नोकरी, पगारही भरगच्च, कशी आहे ITBP कॉन्सेटबल पदाची निवडप्रक्रिया?