Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024, Sarkari Naukri 2024: तरुणांना आता सरकारी नोकर होण्याची नामी संधी चालून आली आहे. भारतीय नौदलाने तरुणांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. नौदलातर्फे एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदासाठी ही भरती काढली काढली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात नौदलाने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेविषयी नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्त माहिती घेऊ शकतात. 


SSR Medical Assistant Recruitment 2024: अर्ज प्रक्रिया कधी चालू होणार? 


भारतीय नौदलातर्फे घेतल्या जाणाऱ्या एसएसआर मेडिकल असिस्टंट पदासाठीची भरती प्रक्रिया चालू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणआर आहेत. 7 सप्टेंबर 2024 पासून त्यासाठी अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेटवची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. 


Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024: नोटिफिकेशनची माहिती कुठे मिळणार? 


भारतीय नौदलाने या भरती प्रक्रियेसाठी 29 ऑगस्ट 2024 रोजी अधिसूचना जारी केली होती. भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हे नोटिफिकेशन डाऊनलोड करता येईल.


Indian Navy Recruitment 2024: शिक्षणाची अट काय? 


एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदाच्या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 +2 इंटरमिडीयटची परीक्षा (फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी) उत्तीर्ण होणे (कमीत कमी 50 टक्के गुण) आवश्यक आहे.   


Indian Navy SSR Medical 2024: वयाची अट काय?


भारतीय नौदलात एसएसआर मेडिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करायचा असेल तर इच्छुक उमेदवाराची जन्मतारीख ही 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या कालावधित असायला हवी.


Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024: अर्ज करण्यासाठी किती फी लागणार


या भरती प्रक्रियेत फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क गाणार नाही. म्हणजेच कोणतीही फी न देता तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. 


Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024: पगार किती मिळणार?


एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदासाठी भारती नौदलाकडून  21,700 रुपये ते 69,100 रुपए प्रति महीना असा पगार दिला जाणार आहे. 


Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024: उमेदवाराची निवड कशी केली जाणार?


एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदासाठी उमेदवाराची निवड करताना भारतीय नौदल चार टप्प्यांत परीक्षा घेणार आहे. 


पहिला टप्पा- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार.


दूसरा टप्पा- लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार.


तिसरा टप्पा- शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होणार. 


चौथा टप्पा- तीन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार 


चारही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची शेवटी मेरिट लिस्ट लावली जाणार. या यादीत ज्या उमेदवारांचे नाव असेल, त्यांना लवकरच नियुक्तीपत्र दिले जाईल. 


शारीरिक क्षमता चाचणीत नेमकं काय होणार?  


शारीरिक क्षमता चाचणीत उमेदवाराच्या वेगवगेळ्या परीक्षा होणार 


रनिंग- या टप्प्यात पुरुष उमेदवाराला साडे सहा मिनिटांत 1.6 किलोमीटर अंतर धावावे लागणार आहे. 


एस्कॉर्ट्स- धावल्यानंतर उमेदवाराला 20 एस्कॉर्ट्स करावे लागतील. तसेच पुरुष उमेदवाराला 15 पुशअप काढावे लागतील.  


हेही वाचा :


Job Majha : टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी : ABP Majha


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI