Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. भाद्रपद महिना देखील सुरु आहे. तसेच, घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं त्यामुळे हा आठवडा अनेक राशींसाठी खास असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. तर, मिथुन राशीला आर्थिक चणचण भासेल. एकूणच ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुमच्या खर्चात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. 


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीत कठोरता ठेवण्याची गरज आहे. देवीची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. नोकरीत परिवर्तनाचे वारे वाहू लागतील. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. जर तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे एक प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन राहील.या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं फार गरजेचं आहे. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वत:ला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्विकारण्यासाछी तयार राहा. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक