ECIL Recruitment 2022 : आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation Of India Limited) ने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ज्यासाठी उमेदवार 8 ऑगस्टपासून म्हणजेच, आजपासून अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


महत्वाची तारखा 


अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 8 ऑगस्ट 2022
अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022 


भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती 


वेल्डर, पेंटर, कारपेंटर, फिटर यांसह अनेक पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 284 पदांवर भरती केली जाणार आहे.  


शैक्षणिक पात्रता 


या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI पदवी असणं आवश्यक आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. 


वयोमर्यादा 


या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असावं. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल.


निवड प्रक्रिया जाणून घ्या


या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. ही गुणवत्ता यादी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केली जाईल. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे.



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :