DRDO Recruitment 2022 : DRDO म्हणजेच, डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनाइजेशनने शिकाऊ पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्जासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2022 ही निश्चित करण्यात आली आहे. DRDO द्वारे शिकाऊ उमेदवारांच्या 20 जागा भरल्या जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार mhrdnats.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी : 10 पदंतंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ  प्रशिक्षणार्थी : 10 पदं

शैक्षणिक पात्रता

पदवीधर प्रशिक्षणार्थी : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवीतंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ प्रशिक्षणार्थी : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी

वयोमर्यादा 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय किमान 18 वर्ष असावं 

स्टायपेंड किती मिळेल? 

पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी : 9000 रुपये प्रति महिनातंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ प्रशिक्षणार्थी : 8000 रुपये प्रति महिना

निवड प्रक्रिया

अधिसूचनेनुसार, या भरतीच्या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांची यादी DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना जाहीर केली जाईल. त्याच यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल आणि करारावर स्वाक्षरी केली जाईल. त्यांची नियुक्ती भारत सरकारच्या नियमांनुसार, केली जाईल. इच्छुक असलेले उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. 

असा करा अर्ज 

इच्छुक आणि पात्र उमेदवार mhrdnats.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :