CRIS Recruitment 2022 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्र म्हणजेच सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमकडून (​CRIS) सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता आणि सहाय्यक डेटा विश्लेषक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट cris.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 150 रिक्त पदांवर बरती करण्यात येणार आहे. 25 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2022 आहे.


महत्वाची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख : 25 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022


रिक्त जागा तपशील
या भरतीअंतर्गत एकूण 150 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदाच्या 144 जागांसाठी आणि सहाय्यक डेटा विश्लेषकच्या 6 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.


शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवारांकडे GATE 2022 स्कोअर असणे आवश्यक आहे. सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडे CSE/CS/CT/IT/CSIT मध्ये BE/B.Tech किंवा 60 टक्के गुणांसह कॉम्प्युटर ऍप्लिकेशन पदवी असणे आवश्यक आहे. तर, सहाय्यक डेटा विश्लेषक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत BE/B.Tech/ME/M.Tech पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच 


वयोमर्यादा
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे वय 22 ते 27 वर्षे दरम्यान असावे. CRIS ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे आणि स्थापनेपासून CRIS भारतीय रेल्वेच्या प्रमुख कार्यात्मक क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर तयार करत आहे. या भरती प्रक्रियेसंबंधित इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळाची मदत घेऊ शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :