Bank of Baroda Recruitment 2022 : बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी. बँक ऑफ बडोदा (BOB) नं कराराच्या आधारावर रिक्त जागा काढल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 60 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. 


जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सीनियर डेव्हलपर - फुल स्टॅक जावा पदांसाठी 16 रिक्त जागा आहेत. डेव्हलपर - फुल स्टॅक जावा पदांसाठी 13 जागा आहेत, तर डेव्हलपर - फुल स्टॅक डॉट नेट आणि जावाच्या पदांसाठी 6 जागा आहेत. याव्यतिरिक्त डेव्हलपर - मोबाइल अॅप्लीकेशन डेव्हलपमेंटसाठी 6 पदं, क्वॉलिटी इन्श्योरंस इंजिनियर्ससाठी 6 पदं, ज्युनिअर क्वॉलिटी इन्श्योरंस इंजिनियर्ससाठी 5 पदांसह एकूण 60 पदांवर भरती केली जाणार आहे. 


वरिष्ठ विकसकासाठी 16 रिक्त जागा आहेत - फुल स्टॅक जावा, 13 विकसक - फुल स्टॅक जावा, 13 डेव्हलपर - फुल स्टॅक.नेट आणि जावा 6, डेव्हलपर - 6 मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी, 6 गुणवत्ता आश्वासनासाठी अभियंते. कनिष्ठ गुणवत्ता हमी अभियंत्यांच्या 5 पदांसह एकूण 60 पदांची भरती करायची आहे.


शैक्षणिक पात्रता 


उमेदवारांनी मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतून संगणक विज्ञान किंवा IT मध्ये BE/B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अनुभव विहित केलेले आहेत.


निवड प्रक्रिया 


उमेदवारांची निवड शॉर्ट लिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत आणि इतर कोणत्याही निवड पद्धतीच्या आधारे केली जाईल.


अर्ज शुल्क 


या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्जाची फी 600 रुपये असेल. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.


कसा कराल अर्ज? 



  • सर्वात आधी bankofbaroda.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • मुख्यपृष्ठावर जाऊन "Current Opportunities" या लिंकवर क्लिक करा

  • आता "Apply Now" वर क्लिक करा

  • विनंती केलेली माहिती भरा

  • फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्याचं नाव भरा

  • अर्ज फी भरा

  • फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा सर्व तपशील तपासून पाहा 

  • आता फॉर्म सबमिट करा

  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर प्रिंट आऊट काढा 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


FSSAI मध्ये दहावी-बारावी आणि पदवीधरांसाठी रिक्त जागा, प्रतिमाह 2 लाखांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी