FSSAI Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी. भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) ने नोकरीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत, FSSAI ने सल्लागार, सहसंचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपसंचालक यासह अनेक पदांची भरती केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार fssai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 नोव्हेंबर 2022 आहे.


महत्वाच्या तारखा 



  • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 10 ऑक्टोबर 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2022


भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती 



  • अॅडव्हायझर : 1 पद 

  • जॉईंट डायरेक्टर : 6 पद 

  • सीनियर मॅनेजर : 1 पद

  • सीनियर मॅनेजर (आयटी) : 1 पद

  • डेप्युटी डायरेक्टर : 7 पदं

  • मॅनेजर : 2 पदं

  • असिस्टंट डायरेक्टर : 2 पदं

  • असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) : 6 पदं

  • डेप्युटी मॅनेजर : 3 पदं 

  • अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर : 7 पदं

  • सीनियर प्रायव्हेट सेक्रेटरी : 4 पदं

  • पर्सनल सेक्रेटरी : 15 पदं

  • असिस्टंट मॅनेजर (आयटी) : 1 पद

  • असिस्टंट : 7 पदं

  • ज्युनिअर असिस्टंट (ग्रेड- I) : 1 पद

  • ज्युनिअर असिस्टंट (ग्रेड- II) : 12 पदं

  • स्टाफ कार ड्रायव्हर (Ordinary Grade) : 3 पदं


वेतनश्रेणी 



  • अॅडव्हायझर : 1,44,200- 2,18,200 रुपये

  • जॉईंट डायरेक्टर : 78,800- 2,09,200 रुपये

  • सीनियर मॅनेजर : 78,800- 2,09,200 रुपये

  • सीनियर मॅनेजर (आयटी) : 78,800- 2,09,200 रुपये

  • डेप्युटी डायरेक्टर : 67,700- 2,08,700 रुपये

  • मॅनेजर : 67,700- 2,08,700 रुपये

  • असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) : 56,100- 1,77,500 रुपये

  • डेप्युटी मॅनेजर : 56,100- 1,77,500 रुपये

  • अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर : 47,600- 1,51,100 रुपये

  • सीनियर प्रायव्हेट सेक्रेटरी : 47,600- 1,51,100 रुपये

  • पर्सनल सेक्रेटरी : 44,900- 1,42,400 रुपये

  • असिस्टंट मॅनेजर (आयटी) : 44,900- 1,42,400 रुपये

  • असिस्टंट : 35,400- 1,12,400 रुपये

  • ज्युनिअर असिस्टंट (ग्रेड- I) : 25,500- 81,100 रुपये

  • ज्युनिअर असिस्टंट (ग्रेड- II) : 19,900- 63,200 रुपये

  • स्टाफ कार ड्रायव्हर (Ordinary Grade) : 19,900- 63,200 रुपये


कसा कराल अर्ज? 


सर्वात आधी, उमेदवारांनी निर्धारित वेळेत ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी 'नियोक्ता/संवर्ग नियंत्रण प्राधिकरण' आणि इतर सहाय्यक प्रमाणपत्रं/कागदपत्रं सोबत घेणं आवश्यक आहे. फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्या लागतील.
पत्ता : सहायक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, तिसरा मजला, FDA भवन, कोटला रोड, नवी दिल्ली





अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.