Engineering Jobs : इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा अथवा पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) येथे प्रोजेक्ट इंजिनियर (Project Engineer) आणि प्रोजेक्ट सुपरवायजर (Project Supervisor) या पदांवर भरती निघाली आहे. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छूक आणि पात्र आहेत, ते अर्ज करु शकतात. (BHEL Recruitment 2022) पात्र उमेदवार careers.bhel.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 नोव्हेंबर इतकी आहे. 


BHEL Vacancy 2022 येथे निघालेल्या जागांसदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. निवड झालेल्या उमेदवाराला 78 हजार रुपयांपर्यंतचं वेतन मिळणार आहे. 


प्रोजेक्ट इंजीनियर
(मॅकेनिकल)- 2 जागा
(इलेक्ट्रिकल)- 7 जागा
(इलेक्ट्रॉनिक्स)- 5 जागा


प्रोजेक्ट सुपरवायजर
(मॅकेनिकल)- 4 जागा
(इलेक्ट्रिकल)- 7 जागा
(इलेक्ट्रॉनिक्स)- 5 जागा


महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख- 25 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची अखेरची तारीख - 15 नोव्हेंबर 2022


वयाची अट काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 32 वर्षांपर्यंत असावं. आरक्षित वर्गासाठी यामध्ये नियमांनुसार सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी careers.bhel.in या संकेतस्थळाला भेट द्या... 


शैक्षणिक पात्रता काय आहे?
प्रोजेक्ट इंजीनियर पदासाठी (BHEL Project Engineering Recruitment 2022) अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे  मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात 60 टक्के गुणांसह बीटेकची पदवी असावी. प्रोजेक्ट सुपरवायजर पदासाठी अर्ज करणाऱ्या (BHEL Project supervisor Recruitment 2022) उमेदवाराकडे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात डिप्लोमा झालेला गरजेचा.  


पगार किती?
प्रोजेक्ट इंजीनियर आणि प्रोजेक्ट सुपरवायजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 43,550 रुपयांपासून ते 78,000 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.  


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


आणखी वाचा :


Companies Laid Off Employees: 2022 मध्ये 'या' कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचारी काढून टाकले, खर्चात केली कपात; जाणून घ्या


Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद आणि भारतीय पोस्ट विभागात विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज