Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकाऱ्यांच्या 500 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर सुरू झाली आहे.

Continues below advertisement


या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 30 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार आहे. उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि वेळेत अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.


किती पदे आहेत रिक्त? 


या भरती मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांची एकूण 500 पदे भरली जातील. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि सन्माननीय करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी खास आहे.  


पात्रता काय असावी?


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा भारत सरकार/नियामक संस्थेकडून मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी किंवा एकात्मिक दुहेरी पदवी असणे आवश्यक आहे. सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान 60 टक्के गुण (SC/ST/OBC/PWD साठी किमान 55 टक्के). किंवा उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट देखील असू शकतो.  


वयोमर्यादा काय?


या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे.


निवड प्रक्रिया कशी असेल?


उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा एका भरती एजन्सीमार्फत घेण्यात येईल. मेरिट लिस्टच्या आधारे पात्र उमेदवारांना 1:3 च्या प्रमाणात मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीसाठी अनुक्रमे 150 आणि 100 गुणांचे प्रमाण निश्चित करण्यात आले असून, त्याचे 75:25 च्या प्रमाणात रूपांतर करण्यात येईल. पात्र होण्यासाठी, ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निवड प्रक्रियेत सर्वसाधारण / EWS प्रवर्गासाठी किमान 50 टक्के गुण, तर आरक्षित प्रवर्गासाठी किमान 45 टक्के गुण आवश्यक असतील.


अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे


अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1180 रुपये आहे. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 118 रुपये निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येईल.


अर्ज कसा कराल?


- सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जा.


- होमपेजवर भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.


- आवश्यक सर्व माहिती अचूकपणे भरा.


- नंतर ठरवलेला अर्ज शुल्क ऑनलाइन भरावा.


- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआऊट काढून आपल्याकडे जतन करा.


आणखी वाचा 


तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, AAI मध्ये विविध पदांसठी भरती सुरु, पगार मिळणार 1 लाख 40 हजार रुपये