New Cheque Payment Rules : बँकिंग क्षेत्रात चेक पेमेंट हि काहीशी वेळखाऊ पद्धत मानली जाते. ज्यामध्ये एकदा चेक जमा केला की पुढे किमान एक-दोन कामकाजाचे दिवस वाट पाहावी लागते आणि नंतर मग तो चेक क्लिअर होऊन पैसे खात्यात जमा होतात. मात्र हि वेळखाऊ आणि गुंतागुंतीची पद्धत आता हद्दपार होणार आहे. कारण नव्या नियमांनुसार आरबीआय येत्या काही दिवसांत चेक क्लिअर करायची नवी पद्धत अमलात आणणार आहे. जेणेकरून बँके चेक जमा केल्यास पुढच्या काही तासात खात्यात पैसा जमा होणार आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेचे नवीन चेक (Cheque) क्लिअरिंगचे नवीन नियम लागू होणार असल्याचे सांगितलं जातंय. बँकिंग क्षेत्रात नवंनवीन तंत्रज्ञानं आणि नव्या कार्यप्रणालीचा आवलंब केला जात असल्याने चेक पेमेंट संदर्भातील हा नियम खातेधारकांस मदतशीर ठरणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून चेक ट्रान्सेक्शन सिस्टीममध्ये मोठा बदल, वेळेची बचत

मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने (RBI) चेक क्लिअरन्सच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे चेक क्लिअरन्सला लागणाऱ्या वेळे मोठी बचत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने चेक ट्रान्सेक्शन सिस्टीम म्हणजे CTS चे रूपांतर सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑन रिअलायझेशनमध्ये करण्याची घोषणा केली. येत्या 4 ऑक्टोबरपासून हि नवी कार्यप्रणाली लागू केली जाणार असल्याचे सांगितलं जातंय. सध्याघडीला बँकेत चेक जमा केल्यावर चेक क्लिअर होण्यासाठी लागणार वेळ आणि ग्राहकांची गैरसोया लक्ष्यात घेता मध्यवर्ती बँकेने त्यांच्या नियमांमध्ये लक्षणीय बदल केले आहेत. परिणामी नवीन सिस्टीप्रमाणे बँकेत चेक जमा केल्यावर काही तासांतच चेक क्लिअर होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे पूर्वी लागणाऱ्या एक-दोन दिवसांच्या वेळेचे काम नवीन सिस्टीममध्ये काही तासांतच पूर्ण होणार आहे.

SBI ऑनलाइन IMPS ट्रान्सफरवर आकारण्यात येणारे शुल्क बदलणार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने IMPS (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) द्वारे ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. SBI 15 ऑगस्टपासून ऑनलाइन IMPS ट्रान्सफरवर आकारण्यात येणारे शुल्क बदलणार आहे. हा बदल किरकोळ ग्राहकांसाठी असेल. त्याच वेळी, हे बदल 8 सप्टेंबरपासून कॉर्पोरेट ग्राहकांसाठी लागू होतील. SBI चा हा नियम सुमारे 40 कोटी ग्राहकांना प्रभावित करण्याची अपेक्षा आहे.

किती शुल्क भरावे लागेल?

सहसा IMPS चा वापर ऑनलाइन पैसे जलद पाठवण्यासाठी केला जातो, परंतु आता या नवीन बदलामुळे तुम्हाला काही मोठ्या व्यवहारांवर थोडीशी किंमत मोजावी लागू शकते. तथापि, SBI ने लहान व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना या नियमाच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. 25,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

तर इंटरनेट बँकिंग किंवा YONO अॅपद्वारे 25,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 25,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्सफरसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावे लागेल.

25,000 ते 1 लाख रुपये - 2 रुपये + जीएसटी

1 लाख ते 2 लाख रुपये -6 रुपये + जीएसटी

2लाख ते 5 लाख रुपये - 10 रुपये + जीएसटी

कृपया लक्षात ठेवा की हे शुल्क फक्त ऑनलाइन केलेल्या आयएमपीएस व्यवहारांवर (इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग) लागू असेल.

हेदेखील वाचा