Northeast Frontier Railway Recruitment 2022: रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांसाठी बंपर भरती काढण्यात आली आहे. रेल्वे भर्ती सेल, RRC ने उत्तर सीमा रेल्वेमधील विविध युनिट्सच्या विविध ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जून 2022 पासून ऑनलाइन सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 5636 पदे भरण्यात येणार आहेत.


महत्वाच्या तारखा


ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 1 जून 2022 
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022


शैक्षणिक पात्रता


पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. उमेदवाराने मॅट्रिक आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


असा करा अर्ज 



  • इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nfr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर 'जनरल इन्फो' विभागात गेल्यानंतर, 'रेल्वे रिक्रूटमेंट सेल'च्या टॅबवर क्लिक करा.

  • आता तुम्हाला अर्जाच्या लिंकवर जाऊन तपशील भरा. यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

  • खाली दिलेल्या लिंकवरून भरतीची सूचना पहा.


महत्त्वाच्या इतर बातम्या