Aeronautical Engineering : आपल्याकडे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतात. अनेकांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असते. परंतु, अभियांत्रिकी क्षेत्रातही अनेक शाखा आहेत, या शाखांपैकी बहुतांश मुले संगणक विज्ञान निवडतात. काही सिव्हिल घेतात, तर काही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलकडे जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती म्हणजे वैमानिक अभियांत्रिकीची. या शाखेत प्रवेश घेतल्यास तुमचे भविष्य इतर क्षेत्रातील अभियंत्यांपेक्षा चांगले होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अॅरोनॉटिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतल्यानंतर नासासारखी वैज्ञानिक संस्था तुम्हाला लगेच नोकरी देऊ शकते.

  


Aeronautical Engineering :  अॅरोनॉटिकल अभियांत्रिकी म्हणजे काय?


अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग हे अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात कठीण क्षेत्र मानले जाते. त्याचा अभ्यास खूप आव्हानात्मक असतो. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रात येण्यास घाबरतात. तुम्ही एकदा अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग केले की तुमच्यासाठी भविष्यात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. अॅरोनॉटिकल नॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेत असलेले विद्यार्थी अवकाश संशोधन, संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रे तसेच लष्करी विमानांची निर्मिती करण्याचे शिक्षण घेतात. 


Aeronautical Engineering :  अॅरोनॉटिकल इंजिनिअरिंग कोण करू शकतो?


तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे असेल तर ते पदवी आणि पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट स्तरावर करता येते. पदवी स्तरावर वैमानिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 50 ते 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. दुसरीकडे जर तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुमच्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. देशातील अव्वल वैमानिक अभियांत्रिकी संस्था पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश परीक्षा घेतात आणि ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला गुणवत्तेनुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेल.


Aeronautical Engineering :  अॅरोनॉटिकल इंजिनिअर्सना नोकरीची संधी


अॅरोनॉटिकल इंजिनिअर्सना भारतातील आणि परदेशातील अनेक खासगी विमान कंपन्यांमध्ये, नॅशनल अॅरोनॉटिकल लॅबमध्ये, संरक्षण मंत्रालयाच्या अनेक प्रकल्पांमध्ये, नागरी विमान वाहतूक विभागात, इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आणि अगदी नासामध्ये उत्कृष्ट नोकऱ्या मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नासा सारख्या संस्थेत नोकरी मिळाली तर तुमचा सुरूवातीचा पगार वार्षिक 12 ते 15 लाख रुपये असू शकतो.  


महत्वाच्या बातम्या 


UPSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 500 हून अधिक पदांवर भरती, सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल पगार 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI