AAI Recruitment 2023 : तुम्ही नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये नोकरभरती करण्यात येणार आहे. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI-Airports Authority of India) ने अलीकडेच कनिष्ठ कार्यकारी (ACT) पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या रिक्त पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते उमेदवार AAI च्या aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. लवकरच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.


भारतीय विमानतळ प्राधिकरणात 496 पदांवर भरती


भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरतीची अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे 496 पदांवर भरती करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही AAI भरतीसाठी aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया आणि या भरतीसंबंधित इतर माहितीसाठी उमेदवारांनी भरती अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.


AAI Recruitment 2023 Vacancy : रिक्त जागा तपशील



  • पद : कनिष्ठ कार्यकारी

  • एकूण पदे : 496 पदे


AAI Recruitment 2023 Date : भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा


ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 नोव्हेंबर 2023


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023


AAI Recruitment 2023 Application Fees : अर्ज फी


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या OBC आणि सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, एससी, एसटी, अपंग किंवा महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.


AAI Recruitment 2023 Application : पात्रता


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे B.Tech किंवा BE किंवा B.Sc ची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.


AAI Recruitment 2023 : वयोमर्यादा


या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. लक्षात ठेवा की वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी मोजले जाईल.


AAI Recruitment 2023 Application : पगार किती मिळेल?


या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.


AAI Recruitment 2023 Application : अर्ज कसा करावा



  • उमेदवार प्रथम AAI च्या अधिकृत वेबसाइट aai.aero वर जातात.

  • त्यानंतर होम पेजवर दिसणार्‍या करिअर टॅबवर क्लिक करा.

  • यानंतर, Recruitment वर क्लिक करा आणि संपूर्ण अधिसूचना आणि अटी वाचा.

  • त्यानंतर Apply लिंकवर क्लिक करा, नोंदणी करा आणि अर्ज भरा.

  • यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अपलोड करा आणि फी जमा करा.

  • शेवटी अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.