विशाखापट्टणम: कृणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर तब्बल 80 धावांनी मात केली आणि आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं.

 

मुंबईचा हा तेरा सामन्यांमधला सातवा विजय ठरला असून मुंबईनं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दिल्लीचा हा अकरा सामन्यांमधला पाचवा पराभव असून, डेअरडेव्हिल्सची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.

संबंधित बातमी - हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये


विशाखापट्टणममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईनं दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. पण दिल्लीचा डाव विसाव्या षटकात 126 धावांवरच आटोपला.

 

मुंबईकडून जसप्रीत बुमरानं तीन तर कृणाल पंड्यानं दोन विकेट्स काढल्या.

 

त्याआधी कृणाल पंड्याच्याच फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं  20 षटकांत चार बाद 206 धावांची मजल मारली होती.

 

कृणालनं 37 चेंडूंमध्येच सात चौकार आणि सहा षटकारांसह 86 धावांची खेळी केली तर मार्टिन गप्टिलनं 48 धावा फटकावल्या.

संबंधित बातम्या


हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये