जेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले...
यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेने पाकिस्तानला आवर घातला नाही, तर भारताला पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा मार्ग नसेल, असं स्पष्ट केलं. पण पूर्व पाकिस्तानातील समस्या या पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचा गवगवा पाकिस्तानकडून सुरु होता. त्याला इंदिरा गांधींनी सडेतोड उत्तर देत, पूर्व पाकिस्तानातील गंभीर समस्येमुळे भारतातील पूर्वेकडील राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानसंदर्भात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं. एकिकडे इंदिरा गांधी पाकिस्तानची कोंडी करत होत्या, तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होत्या. यात पाकिस्तानविरोधात अमेरिकेने मवाळ धोरण स्विकारल्याने इंदिरा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत संघसोबत एक करार केला. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांनी सुरक्षेची हामी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउरीमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, अशी भावना भारतीय जनमानसातून व्यक्त होत आहे. पण यासाठी युद्धाचा निर्णय घेणं हे कधीही योग्य नसतं. या नाजूक प्रसंगात सर्वच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण करुन देत आहेत. कारण, इंदिरा गांधींनी 1971 मधील ऐतिहासिक युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती.
बांग्लादेश आता पाकिस्तानचा भाग नसून ते एक स्वतंत्र राष्ट्र आहे, असा इंदिरा गांधींच्या या घोषणेचा अर्थ होता. भारताकडून ही घोषणा यासाठी करण्यात आली, जेणेकरुन युद्ध समाप्तीच्या वेळी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघासमोर गेला तर बांग्लादेशाचा मुद्दा तिथे लटकत राहू नये. याचदरम्यान अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी आपल्या नैदलातील सर्वात शक्तीशाली सातवी युद्धनौका बंगालच्या खाडीकडे रवाना केली. याला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएत संघानेही भारतासोबतच्या करारानुसार आपली एक युद्धनौका हिंद महासागरात पाठवली. अशाप्रकारे जगातील दोन महासत्ता या युद्धात सहभागी होऊ पाहात होत्या. अशात अमेरिकेची युद्धनौका बंगालच्या खाडीत दाखल होईपर्यंत पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यासाठी इंदिरा गांधींनी झटपट पावले उचलली. यानंतर भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल सॅम मानेक शॉ यांनी तत्काळ पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला.
पाकिस्तानच्या भूमिकेमुळे इंदिरा आपल्या निर्णयावर ठाम होत्या. युद्ध अटळ असल्याची कुणकुण दोन्हीबाजूला लागली होती. पण पहिला हल्ला चढवणार कोण? हा एकच प्रश्न होता. याचे उत्तर 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननेच दिले. या दिवशी रात्री 11 वाजता पाकिस्तानी एअर क्राफ्टनी पुन्हा भारतीय हद्दीत प्रवेश करुन, काही शहरांबर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर इंदिरा गांधींनी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकी घेतल्या. सोबतच त्यांनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेऊन त्यांनाही विश्वासात घेतले. यानंतर मध्यरात्री ऑल इंडिया रेडिओवरुन देशाला संबोधित करुन देशवासियांना परिस्थितीची माहिती दिली.
पाकिस्तानचे कमांडर नियाजी यांनी पहिल्यांदा लेफ्टनंट जनरल अरोडा यांच्यासमोर आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, अन् आपल्या वर्दीवरील बिल्ले उतरवले. तसेच आत्मसमर्पणचे प्रतिक म्हणून नियाजींनी आपले रिव्हॉलव्हर जनरल अरोडा यांच्याकडे सुपूर्द केलं. भारताने केवळ 14 दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं. अशाप्रकारे इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केलं.
पाकिस्तानचे सरकार आणि त्यांचे सैन्य दल आपल्याच देशवासियांवर अन्याय करत होतं. त्यामुळे तेथील नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड केलं होतं. हे बंड मोडीत काढण्यासाठी सैन्यदलानं मोठं हत्याकांडच सुरु केलं. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक इतरत्र पलायन करु लागले. त्या काळात पूर्व पाकिस्तानातून तब्बल 10 लाख नागरिक भारतात निर्वासित होऊन आले होते. त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर याप्रकरणी तोडगा काढून, कारवाई करण्यासाठी सातत्याने दबाव वाढत होता. त्यामुळे इंदिरा गांधींनी एकीकडे भारतीय सैन्य दलाला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही पाकिस्तानवर दाबाव आणण्यास सुरुवात केली.
25 एप्रिल 1971 रोजी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एक बैठक घेऊन सैन्यप्रमुखांना पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी आवश्यकता असल्यास युद्ध लढण्याची परवानगी दिली होती. इंदिरा गांधींना असं यासाठी केलं होतं, कारण त्यावेळी भारताच्या पूर्व बाजूला असलेल्या पाकिस्तानमधील (आज बांगलादेश त्याला या नावाने ओळखले जात) स्थित्यंतराचा थेट परिणाम भारतावर होत होता.
यासोबतच इंदिरा गांधींनी भारतीय सैन्य दलाला ढाकाकडे कूच करण्याचे आदेश दिले. इंदिरा गांधींच्या या आदेशानंतर भारताच्या वायूदलानेही पश्चिम पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली. भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानची मोठी कोंडी केली. 3 डिसेंबरच्या हल्ल्याचे उट्टे भारतीय सैन्य दलाने आपल्या ऑपरेशन ट्रायडेंटने काढले. 4 सप्टेंबर 1971 रोजी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन ट्रायडेंटची सुरुवात करुन, भारतीय नौदलाने या युद्धात दोन मोर्चावरुन पाकिस्तानच्या मुस्क्या आवळल्या. यातील पहिला मोर्चावर बंगालच्या खाडीतून पाकिस्तानच्या नैदलाला टक्कर दिली. तर दुसऱ्या मोर्चवरुन पाकिस्तानी सैन्यदलाला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. 5 सप्टेंबर रोजी भारतीय नैदलाने कराचीच्या बंदरावर मोठ्याप्रमाणात बॉम्ब हल्ला चढवून पाकिस्तानच्या नैदलाचे मुख्यालयच उद्धवस्त केलं. पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी झालेली पाहून इंदिरा गांधींनी बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
तर दुसरीकडे पूर्व पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय गंभीर होत होती. तिथे पोलीस, पॅरामिलेट्री फोर्स, इस्ट बंगाल रेजिमेंट आणि इस्ट पाकिस्तान रायफल्सचे बंगाली सैनिक यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड पुकारुन देशाचे स्वातंत्र्य घोषित केले. याचवेळी त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा केली. यावेळी भारतीय सैन्यदलाच्या वतीने येथील नागरिकांना प्रशिक्षण देऊन, मुक्ती वाहिनीचा जन्माला आली. पण दुसरीकडे पाकिस्तानने आपला हेका सोडला नव्हता. चीन आणि अमेरिकेच्या जोरावर पाकिस्तानने भारताच्या खोड्या काढण्याचे उद्योग सुरुच होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पाकिस्तानी एअर क्राफ्टनी सातत्याने भारतीय सीमेत प्रवेश केला. यावर भारताकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आला. पण पाकिस्तानने त्याला गांभीर्याने घेतला नाही. उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याया खान यांनी भारताला 10 दिवसांच्या आत युद्धाची धमकीच दिली. भारताने यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केल्याने, पाकिस्तानला याचा जराही अंदाज नव्हता.
पण पाकिस्तान आपल्याच मिजशीत होता. पूर्व पाकिस्तानातील सैन्य कमांडर ए.ए.के.नियाजी यांनी अमेरिका आणि चीनच्या जोरावर आत्मसमर्पणास नकार दिला. याचवेळी दुसरीकडे भारतीय सैन्यदलाने ढाक्याला तिन्ही बाजूंनी घेरलं होतं. 14 डिसेंबर रोजी ढाक्यामधील पाकिस्तानच्या गव्हर्नरांच्या घरात पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुप्त बैठक सुरु होती. याचवेळी भारतीय सैन्याने त्या घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे पाकिस्तान गर्भगळीत झालं. पाकिस्तानचे कमांडर नियाजींनी तत्काळ युद्धविरामाचा प्रस्ताव भारताकडं पाठवला. पण भारताचे सैन्यप्रमुख मानेकशॉ यांनी युद्धविराम नव्हे तर आत्मसमर्पण करण्यास पाकिस्तानला सांगितले. याची जबाबदारी मेजर जनरल जे एफ आर जॅकब यांच्याकडे सोपवली. यानंतर कोलकातामधील भारताचे माजी कमांड प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोडा ढाक्यात दाखल झाले. अरोडा आणि नियाजी यांनी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन 16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 2.30 वाजता आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरु केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -