उरीमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील 10 महत्त्वाचे मुद्दे
सकाळी 5.30च्या दरम्यान दहशतवादी सैन्य दलाच्या मुख्यालयात घुसले.
हेलिपॅड परिसरातून दहशतवादी मुख्यलयाच्या परिसरात दाखल झाले.
श्रीनगरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या उरीमध्ये पुन्हा एकाद दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. हा हल्ला भारतीय सैन्य दलाच्या 12 ब्रिगेटच्या मुख्यालयावर झाला.
पठाणकोट हल्ल्याची आठवण करून देणारा हल्ला
गेल्या 2 महिन्यांपासू काश्मीर खोरं सतत धुमसतंय
हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांनी रशिया आणि अमेरिका दौरा रद्द केला.
चारही दहशतवादी पाकिस्तानी
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी तातडीची बैठक
चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्य दलाला यश
लष्कर-ए-तोयबाने हल्ला केल्याची शक्यता
बुरहान वानी प्रकरणानंतर येथील परिस्थिती शांत होत नाही आहे. लष्कराने जी बंधनं घातलेली ती शिथिल करण्यास सुरुवात केली होती, मात्र या हल्ल्यानंतर पुन्हा बंधन येऊ शकतील.