ड्रिबलिंगचे बादशाह मोहम्मद शाहिद यांना भावपूर्ण वातवरणात निरोप
जर देशाने ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून पदकांची कमाई केली, तर ती मोहम्मद शाहिद यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी प्रतिक्रीया राजेंद्र सिंह यांनी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहिद यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शाहिद यांच्या अंत्ययात्रेत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांचे प्रतिनिधी साई रिजनल डायरेक्टर राजेंद्र सिंह सहभागी झाले होते. शाहिद यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रीया त्यांनी यांवेळी दिली.
मोहम्मद शाहिद यांचे पार्थिव वाराणसीला पोहोचताच अनेकांना अश्रू आनावर झाले होते.
मोहम्मद शाहिद यांच्यावर टकटकपूरच्या कब्रस्तानामध्ये धार्मिक रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शाहिद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून, त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हणले आहे. शाहिद यांच्या अंत्ययात्रेतही सर्वच क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाहिद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दिनांक २० जुलैच्या रात्री शाहिद यांचे पार्थिव वाराणसीमधील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. हॉकीच्या या खेळाडूच्या निधनाने देशभरात शोकाकुल वातावरण आहे.
वाराणसीमध्ये भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार ऑलम्पियन मोहम्मद शाहिद यांना आज भावपूर्ण वातवरणात अखेरचा निरोप देण्यात आला. २० जुलै रोजी त्यांचे दिल्लीतील वेदांता रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
शाहिद यांच्या अंत्ययात्रेवेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -