आधार कार्डाच्या नव्या नियमावलीचे फायदे
तसेच यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून केले जाणारे आर्थिक व्यवहार अधिकच सुरक्षित होणार आहेत. कारण केंद्र सरकारने यासाठी फिंगर प्रिंट, आयरिस स्कॅनिंग आणि OTP सारख्या सुविधा जोडल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑनलाईन व्हेरिफिकेशन: नव्या नियमावलीमुळे तुमच्या शासकीय तथा निमशासकीय कामांसाठी आधार कार्डचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे. या ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुविधेमुळे तुम्हाला बँक अकाऊंट उघडणे, LPG कनेक्शन घेणे, लायसन्स मिळवणे आणि रेल्वे तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. याप्रकारच्या सर्व सेवा आधार कार्डच्या ई-केवायसी मार्फत होईल.
जर तुमचे आधार कार्ड नसेल, आणि तुम्हाला सरकारच्या कोणत्याही सबसिडीचा लाभ मिळत नसेल, तर हे जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. कारण सरकारच्या या नव्या नियमावलीप्रमाणे, जर सबसिडीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड सरकारने वेळेत बनवून दिलं नाही, तर त्याला त्याचा लाभ मिळवून देणे बंधनकारक केलं आहे. कारण देशातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड बनवण्याची जबाबदारी सरकारची आहे.
सध्याच्या काळात आधार कार्ड सर्वात महत्त्वाचा दस्तावेज झाला आहे. आधार कार्डच्या माध्यमातून सरकारी तसेच निमसरकारी कामे तातडीने मार्गी लागतात. आज आम्ही तुम्हाला आधारच्या नव्या नियमावलीमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती देत आहोत.
डेटा चोरीपासून मुक्ती: भारत सरकारने आधार कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार, ते मिळवताना देण्यात आलेली माहिती आणि डेटा सेक्यूरिटीसाठी नवी नियमावली देण्यात आली आहे. या नव्या नियमावलीने डेटाची सुरक्षितता वाढणार आहे.
तसेच UIAD ने आधार कार्ड लॉक आणि अनलॉकची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे जर तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केले, तर आधार कार्डचा डेटा इतर कोणालाही पाहाता येणार नाही. यासाठीची सर्व माहिती http://uidai.in/beta/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -