'भारतीय लष्कराचे आरमार'
३० मिमी AGL प्रकारची रायफलही आपलं भारतीय सैन्य वापरतं. एकावेळी ३० ग्रेनेड या रायफलमध्ये साठवता येतात. या रायफलची हल्ल्याची क्षमता १०० ग्रेनेड प्रति मिनिट आहे. ७ मीटर व्यासातील जागा उध्वस्त करण्याची क्षमता या रायफलची आहे. (फोटो आणि माहिती सौजन्य : अमित रुके, पुणे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App७.६२ मिमी MMG नावाच्या या रायफलचा वापर भारतीय सैन्याकडून केला जातो. 24 किलोच्या या रायफलमधून मिनिटाला 200 गोळ्या झाडता येतात. 1800 मीटर पर्यंतच्या पल्ल्याचा वेध ही रायफल घेते.
ATGM नावाच्या या शस्त्राचा वापर भारतीय सैन्याकडून केला जातो. एका मिनिटात 3 मिसाईल या शस्त्रातून डागता येतात. तसंच 2500 मीटर पर्यंतचा वेध या रायफलने घेता येतो.
९ मिमी PISTOL नावाची ही बंदुक 15 मीटर पल्ल्याचा वेध घेते. एकावेळी 14 गोळ्या या बंदुकीत साठवता येतात.
भारतीय सैन्य ८४ मिमी RL नावाची रायफलही वापरते. 500 मीटरचा वेध घेऊ शकणाऱ्या या रायफलमध्ये 30 गोळ्या साठवता येतात. एका मिनिटात 6 गोळ्या ही रायफल झाडू शकते.
७.६२ मिमी LMG रायफल भारतीय सैन्याकडून वापरलं जातं. एका मिनिटाट 500 गोळ्यांचा मारा करु शकणारी ही रायफल जवळपास 9 किलो वजनाची आहे. 30 गोळ्यांची साठवण क्षमता असणारी ही रायफल 500 मीटर पर्यंतचा पल्ला गाठू शकते.
भारतीय सैन्याकडून ७.६२ मिमी AK-47 रायफलही वापरली जाते. एकावेळी 30 गोळ्यांची साठवण करता येणारी ही रायफल 300 मीटर पल्ल्यातील लक्ष्याचा वेध घेते.
पुण्यात राजपुताना रायफल्सने भारतीय सैन्याकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. या फोटोतील रायफल ही ५.५६ मिमी insas LMG आहे. या रायफलमध्ये एकावेळी 30 गोळ्या राहतात, तसंच 700 मीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध ही रायफल घेऊ शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -