ब्लू टूथ छत्री, सेल्फी स्टिक छत्री, पाकिटात मावणारी छत्री, छत्र्यांच्या नाना तऱ्हा
पावसाळा सुरु झाला की, बाजारात अनेक प्रकारच्या छत्र्या विक्रीसाठी येतात. केरळमध्ये सध्या मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे आता अनेक दुकानांमधून छत्र्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेरळमधील अलेप्पी हे देशातील मोठं छत्र्यांच मार्केट आहे. या मार्केटमधील वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आपल्याला पाहायला मिळतात.
अलेप्पीमधील पॉपी हे दुकान गेली अनेक वर्षांपासून छत्र्यांसाठी ग्राहकांच्य विशेष आकर्षणाचे केंद्र बनलं आहे.
येथे तुम्हाला पाकिटात मावेल इतक्या लहान छत्रीपासून, संपूर्ण ग्रार्डन कव्हर करेल या महाकाय आकाराची छत्री पाहायला मिळतात.
या दुकानात यावर्षी ब्लू टूथ छत्री पाहयला मिळते आहे. पावसात तुम्ही मोबाईल वापरु शकत नाही. त्यामुळे मुसळधार पावसात जर तुम्हाला कुणाचा फोन आला तर तो घेता येत नाही. अशावेळी ब्लू टूथ छत्रीमधील ब्लू टूथ तुमच्या मोबाईलशा कनेक्ट करून तुम्हाला कोणाशीही संवाद साधता येतो
मुसळधार पावसात तुम्ही एकटे चालला असाल, तुम्हाला टाईमपासला करायचा असेल, त्यावेळी म्यूझिक अम्ब्रेला तुमचं एकटेपण घालवण्यास मदत करेल.
अनेकांना सेल्फीचं वेड असतं. मुसळधार पावसातही अनेकांना सेल्फी काढावा वाटतो. अशावेळी सेल्फी स्टीक अम्बरेला या छत्रीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
पावसाळ्यात पॉपी देशभरात सर्वात जास्त लाखांच्या घरात छत्र्या विकतात
देशातील साडेआठ हजार छत्र्यांची विक्री करणाऱ्या दुकानांना पॉपी छत्र्यांचा पुरवठा करतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -