आता केवळ ५०० रूपयांत इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नावाचे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन 7 ते 30 दिवसात मिळू शकते.
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला अर्ज क्रमांक 4 (A) भरून द्यावा लागतो. यासोबत एकूण 9 कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामध्ये 1). पाच पासपोर्ट साइज फोटो, 2). भारताचे नागरिकत्व असलेला पुरावा, 3). तुमचं मुळ ड्रायव्हिंग लायसन्स, 4). रहिवाशी पुरावा, 5). पासपोर्ट, 6). व्हिजा, 7). मेडिकल फॉर्म, 8). जन्मदाखला आणि 9). तुम्ही ज्या देशात जाणार आहात, त्याच्या विमान तिकीटाची झेरॉक्स कॉपी.
अनेकांना चारचाकी किंवा दुचाकी चालवण्यामध्ये वेगळीच मजा मिळते. ही मजा लुटण्यासाठी आवश्यकता असते, ड्रायव्हिंग लायसन्सची. भारतात एकदा का लायसन्स मिळाले की, तुम्ही संपूर्ण देशात मुक्त संचार करू शकता. पण या चालकांची खरी पंचाईत होते, ती परदेशात गेल्यावर. तिथे अनेकांना ही मजा लुटता येत नाही. पण परदेशातही आता तुम्हाला हा आनंद लुटता येणार आहे. तेही फक्त ५०० रूपये खर्चून. फक्त ५०० रुपयात तुम्ही इंटरनॅशनल ड्रायव्हिग लायसन्स मिळवू शकता.
याचा कालावधी संपल्यानंतर, त्याचं नुतनीकरण करता येत नाही. तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागतो.
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सचा कालावधी एक वर्षांचा असून, त्यासाठी अर्जासोबत तुम्हाला 500 रूपये भरावे लागतात.
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही आरटीओ आॅफिसमध्ये अर्ज करू शकता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -