दोन घरं आणि खूप दागिने असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे!
आमच्या पडताळणीत प्रॉपर्टी आणि सोने खरेदी रजिस्ट्रेशनबाबतचे दावे खोटं ठरतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही असोसिएशन देशभरातील ज्वेलर्सची सर्वात मोठी संस्था आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असा कोणताही नियम नाही. गृहिणी किती सोनं खरेदी करु शकतात. फक्त त्याचं बिल असणं गरजेचं आहे.
त्यानंतर आम्ही सोन्याच्या रजिस्ट्रेशनबाबत व्हायरल होणाऱ्या मेसेजविषयी पडताळणी केली. याबाबत नेमकं खरं काय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही बुलियन मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष एस के गोयल यांच्याशी बातचीत केली.
नोएडातील व्हिक्ट्री वन ग्रुपचे संचालक सुधीर अग्रवाल यांच्या मते, पैसे जर तुमच्या मेहनतीचं असेल तर त्यातून तुम्ही दहा घरं खरेदी करु शकता. पण ज्यांची निनावी संपत्ती आहे त्यांना घाबरण्याची गरज आहे.
यामध्ये सात वर्ष शिक्षेची तरतूद असून यात सहभागी असणाऱ्या व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो. प्रॉपर्टी एका व्यक्तीचा नावावर पण त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीनं पैसे भरणं म्हणजेच निनावी संपत्ती असं या कायद्यात म्हटलं आहे.
निनावी संपत्ती म्हणजे आपल्या पैशांनी स्थावर मालमत्ता दुसऱ्या कुणाच्या नावावर खरेदी करणं आणि या पैशांबाबत आयकर विभागाला कोणतीही माहिती देणं. निनावी संपत्ती कायदा एक नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला असून सगळ्या निनावी व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे.
सर्वात आधी दोन पेक्षा जास्त घरांबाबत जाणून घेऊयात. 2 पेक्षा जास्त घरं नसावीत हा मेसेज निनावी संपत्तीशी निगडीत मुद्दा आहे. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहे की. पुढीला निशाणा निनावी संपत्ती बाळगणाऱ्यांवर असणार आहे.
अशा व्हायरल मेसेजमधून अनेक दावे करण्यात येत आहेत. पण हे दावे किती खरे आहेत. याची पडताळणी आम्ही केली आहे.
व्हायरल मेसेजनुसार, 'जर तुमच्याकडे दागिने किंवा सोन्याचे बिस्कीट आहेत. किंवा दुसऱ्या स्वरुपात सोनं असेल तर 25 नोव्हेंबरपासून सोनं खरेदी आणि ठेवणाऱ्यांसाठी सोन्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. 25 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत हे रजिस्ट्रेशन अनिवार्य असणार आहे. 3 लाखापर्यंतचं सोन्यावर रजिस्ट्रेशन मोफत असणार आहे. पण यापेक्षा जास्त सोन्यावर टॅक्स लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणीही व्यक्ती रजिस्ट्रेशनशिवाय सोनं बाळगत असेल तर ते जप्त करुन दंडही ठोठावण्यात येईल.
फक्त प्रॉप्रर्टी असणाऱ्यांसाठीच नाही तर जे लोकं सोनं खरेदी करत आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची बातम आहे. दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार सोनं खरेदी आणि बाळगणाऱ्यांविरुद्ध नवा कायदा घेऊन येणार आहे.
काय आहे व्हायरल मेसेज: अजून एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सावधान, तुम्ही एका शहरात किंवा एका जिल्ह्यात 2 घरं किंवा प्लॉट ठेऊ शकतात. तसेच दोनच रजिस्ट्रेशन मान्य होणार आहेत. तसेच दोन्ही ठिकाणी वीज कनेक्शन घेणं गरजेचं आहे. 2 पेक्षा अधिक वीज कनेक्शन मिळणार नाही आणि आता 2 पेक्षा जास्त संपत्ती रजिस्टर करता येणार नाही. त्यामुळे तुमचं घर किंवा प्लॉट एकापेक्षा जास्त असेल तर आजच गरजू व्यक्तीला विका.
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, आता यापुढे 2 पेक्षा जास्त स्थावर संपत्ती बाळगू शकत नाही. म्हणजेच जर आपल्याकडे तीन प्रॉपर्टी असल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकतात. नोटाबंदीच्या या निर्णयानंतर या मेसेजमुळे लोक फारच बैचेन आहेत.
500 आणि हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. संपत्ती आणि सोनं खरेदी करुन काळा पैसा मार्गी लावण्याबाबत आता एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, त्यांची संपत्ती किंवा सोनंही आता त्यांना वाचवू शकत नाही. जाणून घ्या या मेसेजबद्दल सत्य.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -