देशवासियांकडूनही यंदाची दिवाळी जवानांना समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी किन्नौरमधील सुमडोमध्ये आयटीबीपी, जवान आणि डोग्रा स्काऊटसोबत पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या संपूर्ण देशात दिवाळी धडाक्यात साजरी होत आहे. भारत-पाक सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत भारतीय जवानांचे स्मरण ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्याला देशभरातूनही मोठा प्रतिसाद मिळाला.
पंजाबच्या अमृतसरमधील नागरिकांनी एकत्रित येऊन 'जय हिंद'च्या जय घोषातील दिव्यांची आरास करुन दिवाळी जवानांना समर्पित केली.
ऑल इंडिया इमाम संघटनेचे अध्यक्ष इमाम उमर अहमद इलियास, हृषिकेशमधील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष एच. एच. स्वामी चिदानंद सरस्वती, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी यांनी वाघा सीमेवर जाऊन भारतीय संरक्षण दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
वाघा सीमेवरील भारतीय संरक्षण दलाच्या महिला सैनिकांनीही अशाप्रकारे दिवाळी साजरी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -