जगातील सर्वात शक्तीशाली 10 सैन्यदलं, भारताचा क्रमांक...
जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं संरक्षण बजेट 581 अब्ज डॉलर आहे. अमेरिकेकडे 8848 टँक, 2785 लढाऊ विमानं, 13 युद्धनौका, 957 हेलिकॉप्टर आणि 75 पाणबुड्या आहेत. 14 लाख सैनिक आहेत.
दुसऱ्या स्थानावर असलेल्या रशियाचं बजेट 46 अब्ज डॉलर आहे. रशियाकडे 15398 टँक, 1438 लढाऊ विमानं, 1 युद्धनौका, 478 हेलिकॉप्टर, आणि 60 पाणबुड्या आहेत. रशियाच्या सैन्यात 7 लाखाहून अधिक जवान आहेत.
तिसऱ्या स्थानावरील चीनच्या सैन्याचं संरक्षण बजेट 155 अब्ज डॉलर आहे. चीनकडे 9158 टँक, 3158 लढाऊ विमानं, 1 युद्धनौका, 200 हेलिकॉप्टर, 68 पाणबुड्या आहेत. 23 लाख सैनिकांचा समावेशही चीनी सैन्यात आहे.
भारताला ग्लोबल फायरपावरनं आपल्या यादीत चौथ्या स्थानावर घेतलं आहे. भारताचं संरक्षण बजेट 40 अब्ज डॉलर आहे. भारताकडे 6464 टँक, 809 लढाऊ विमानं, 2 युद्धनौका, 19 हेलिकॉप्टर, 14 पाणबुड्या आहेत. 14 लाख जवान भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. भारताच्या सैन्याची हीच ताकद जगात चौथ्या स्थानावर ठेवते.
पाचव्या स्थानावरील फ्रान्सच्या सैन्याचं 35 अब्ज डॉलरचं संरक्षण बजेट आहे. फ्रान्सकडे 423 टँक, 284 लढाऊ विमानं, 4 युद्धनौका, 48 हेलिकॉप्टर, आणि 10 पाणबुड्या आहेत. 2 लाखांनी सज्ज असं फ्रान्सचं सैन्य आहे.
ब्रिटनचं सैन्य जगात 6व्या स्थानावर आहे. ब्रिटनचं संरक्षण बजेट 55 अब्ज डॉलर आहे. ब्रिटन सैन्याकडे 407 टँक, 168 लढाऊ विमानं, 1 युद्धनौका, 49 हेलिकॉप्टर, आणि 10 पाणबुड्या आहेत. सैन्यात 1 लाख 50 हजार सैनिकांचा समावेश आहे.
जपानी सैन्य सातवं शक्तीशाली सैन्य आहे. जपानचं संरक्षण बजेट 40 अब्ज डॉलर आहे. जपानकडे 678 टँक, 287 लढाऊ विमानं, 3 युद्धनौका, 119 हेलिकॉप्टर, 7 पाणबुड्या आहेत. तसंच 2 लाख 50 हजार सैनिकही आहेत.
जर्मनी पाठोपाठ आठव्या क्रमांकावर तुर्कीचं सैन्य आहे. या देशाचं संरक्षण बजेट 18 अब्ज डॉलर आहे. तुर्कीकडे 3878 टँक, 207 लढाऊ विमानं, 64 हेलिकॉप्टर, 13 पाणबुड्या आहेत. 4 लाख सैनिकांचा ताफा तुर्की सैन्याकडे आहे.
जगातील सर्वात शक्तीशाली सैन्यदलांमध्ये जर्मनी नवव्या स्थानावर आहे. जर्मनीचं संरक्षणासाठीचं बजेट 36 अब्ज डॉलर आहे. जर्मनीकडे 408 टँक, 169 लढाऊ विमानं, 44 हेलिकॉप्टर, आणि 2 पाणबुड्या आहेत. जर्मनीच्या सैन्यदलात 1 लाख 80 हजार सैनिक आहेत.
इटलीच्या सैन्यदलाला ग्लोबल फायरपॉवरने आपल्या यादीत 10वं स्थान दिलं आहे. इटलीचं संरक्षणाचं बजेट 34 अब्ज डॉलर आहे. इटलीकडे 586 टँक, 158 लढाऊ विमानं, 2 युद्धनौका, 58 हेलिकॉप्टर, 8 पाणबुड्यांचा ताफा आहे. तसंच 3 लाख 20 हजार सैनिकही इटलीच्या सैन्यदलात आहेत.
जगभरातील सैन्यदलांवर नजर ठेवणाऱ्या ग्लोबल फायरपॉवर एजन्सीने 2016 च्या सर्वात शक्तीशाली 10 सैन्यदलांची यादी प्रकाशित केली आहे. भारतीय सैन्यदल या यादीत आघाडीवर आहे.