...तर ताजमहालचं सौंदर्य नष्ट होईल!
भारतीय आणि अमेरिकेच्या संशोधन दलाने ताजमहालचे सौंदर्य नष्ट होण्यासाठी तेथील कचरा जाळणे कारणीभूत असल्याचे सांगितलं आहे. ताजमहालजवळ कचरा जाळणे हे या ऐतिहासिक वास्तूसाठी नुकसानकारक असल्याचे आपल्या आहवालात स्पष्ट केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दलाने ताजमहालजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर शेणी जाळणे आणि कचरा जाळणे यावरुन कोणते नुकसान होतं यावर तुलनात्मक अध्ययन केलं आहे. या नव्या उपायांच्या प्रयोगमध्ये मिनेसोटो विश्वविद्यालयाचा अजय नागपुरे आणि जॉर्जिया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा राज लाल यांचा सहभाग होता. यांच्या टीमने वैज्ञानिक आधारावर सिद्ध होणारे पुरावे दिले सादर केले आहेत. त्यानुसार, ताजमहालच्या वास्तूजवळ कचरा जाळण्याने वायू प्रदूषणातील 'पार्टीकुलेट मॅटर' ला वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
संशोधकांच्या टीमला उघड्यावर कचरा जाळण्याने वायू प्रदुषणातील पार्टीकुलेट मॅटर 2.5 चा थर प्रतिवर्ष 150 मिलीग्रॅम वर्ग मीटर जमा होत असल्याचे आढळले. तर हाच थर शेणी जाळल्याने प्रतिवर्ष 12 मिलीग्रॅमच तयार होत असल्याचे आढळले.
या टीमने या दोन्हीचे थर एकत्रित करुन पार्टीकुलेट मॅटर 2.5शी संबंधित अकाली मृत्यूदराच्या विश्लेषण करुन आहवाल दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -