कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी सरदाराने घेतला पगडीचा आधार
सरवन सिंहने पगडी उतरवून ती झाडाला बांधली. एका हाताने वस्त्राचा आधार घेऊन कॅनलमध्ये उरतला. त्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या कापडात कुत्र्याला गुंडाळून त्याचा जीव वाचवला. यानंतर तिथे असलेल्या लोकांनी सरवन सिंहला सलाम केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घटनेचा व्हिडीओ यू ट्यूबवर कॅटर्स क्लिप या नावाने अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओत सरवन सिंह त्याच्या पगडीचा आधार घेऊन कॅनलमध्ये उतरताना दिसत आहे.
एका कॅनलमध्ये पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्याचा संघर्ष सुरु होता. त्याची तडफड पाहून सरवन सिंह मदतीसाठी धावून गेला. खरंतर या कॅनलमध्ये उतरणं अवघड असल्याने सरदारने त्याच्या पगडीचा आधार घेत, कुत्र्याचा जीव वाचवला.
शीख धर्मात पगडीचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एका सरदारने त्याच्या पगडीचा आधार घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -