डिजिटल लॉकर सुविधा आजपासून सुरु
डिजिलॉकरच्या माध्यमातून आपली महत्त्वाची कागदपत्रं संग्रहीत करुन ठेवता येतील. यात ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचं आरसी बुक, आदी कागदपत्र सुरक्षितरित्या जतन करुन ठेवता येणार आहेत.
या सुविधेचा वापर करण्यासाठी https://digilocker.gov.in/ वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
तपासणीवेळी कागदपत्रं न मिळाल्यास दंडही आकारला जाणार आहे.
या सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार क्रमांकावरून डिजिलॉकरला लॉग इन करता येणार आहे. आधार नोंदणीवेळी दिलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी देऊन लॉगिन करता येईल.
वाहतूक पोलिसांनी कागदपत्रं विचारल्यास डिजिलॉकरवरील आपली कागदपत्र दाखवणे शक्य होणार आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया या उपक्रमाचा एक भाग म्हणून डिजिलॉकर सुविधा आजपासून सुरु झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.