दिल्लीत 'तुफान' पाऊस, अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम
मुसळधार पावसामुळे दिल्ली वाहतूक पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी सर्वांना प्रवासावेळी गाड्यांचे पार्किंग लाईट सुरु करून चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका बाईक चालकांना बसला आहे. तर पायी प्रवास करणारे नागरिक फ्लायओव्हरचा आधार घेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली-गुढगाव दरम्यान मुसळधार पावसामुळे गुडगाव पोलिसांनी सर्वांना सावधगिरिने गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे.
मुसळधार पावसामुळे दिल्ली सचिवालयाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याने पदपथाची उंची गाठल्याने अनेक गाड्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर दुसरीकडे आयटीओजवळील यमुना ब्रिजवर पावसाने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
दिल्ली-एनसीआर परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामने दिल्लीच्या स्पीडला ब्रेक लावला आहे. दरम्यान आज हवामान विभागाने दिल्लीत आगामी 24 तासात मुसळधार पाऊस सुरु राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
पावसामुळे अनेक शासकीय कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. यात भारत दौऱ्यवर असलेल्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींच्या सर्व कार्यक्रमांवर पावसाने पाणी फिरवले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -