LIVE BLOG : Pulawama Attack : पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी 12 पेक्षा अधिक संशयित पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या भ्याड हल्ल्यासाठी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी नागरिक करत आहेत. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Feb 2019 11:47 PM
पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी 12 पेक्षा अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जैश ए मोहम्मदच्या सक्रिय दहशतवाद्यांचा शोध सुरु
शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत पोहोचले, पार्थिव जवानांच्या मूळ गावी रवाना होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सितारमण, लष्करप्रमुख बिपीन रावत दिल्लीत दाखल
40 जवानांचा जीव वाचवणारा बहाद्दर, संशयित गाडी पाहून बसचा ब्रेक दाबला, गृहमंत्र्याच्या भेटीदरम्यान जखमी जवानाची माहिती
माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागचा इशारा, सुधर जावो वरना सुधार देंगे
पुलवामामधील हल्ल्यातील शहीद जवानांच्या पार्थिवांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खांदा दिला. त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंगही होते.
राज्य सरकारच्या मदतीआधी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून शहिद जवानांना मदत जाहीर, काल झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या मदतीसाठी अद्याप कुठलीही हालचाल नाही


पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्ताला बोलावलं, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी बोलावलं

गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचा पाकिस्तान दौरा रद्द, पुलवामा हल्ल्यानंतर दौरा रद्द करण्याचा निर्णय, दोघांना कराची साहित्य मेळाव्याचं होतं निमंत्रण
नवी दिल्ली : भारताकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स
पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची अपील चीनने फेटाळली
पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची अपील चीनने फेटाळली
ना विसरणार, ना माफ करणार, हल्ल्याचा बदला घेणार; पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला राजकीयदृष्ट्या एकटं पाडणार : पंतप्रधान मोदी
130 कोटी भारतीय सडेतोड उत्तर देतील, शेजारी देशांचे इरादे कधीही पूर्ण होऊ देणार नाही : पंतप्रधान मोदी
संपूर्ण विश्वाने दहशतवादाविरोधात एकत्र लढा द्यायला हवा : पंतप्रधान मोदी
दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार : पंतप्रधान मोदी
दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार : पंतप्रधान मोदी
पुलावामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि त्यांना त्यांची किंमत चुकवावीच लागेल : पंतप्रधान मोदी
पुलावामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि त्यांना त्यांची किंमत चुकवावीच लागेल : पंतप्रधान मोदी
या हल्ल्यामुळे देशातील जनतेमध्ये आक्रोश आहे. जनतेचं रक्त खवळत असल्याचं मी समजू शकतो. आपल्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या सैनिकांच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे : पंतप्रधान मोदी
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. देशाची सेवा करताना त्यांनी आपले प्राण अर्पण केले. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करतो : पंतप्रधान मोदी
पुलवामा हल्ल्याला मदत करणारे गुन्हेगार वाचणार नाहीत : अरुण जेटली
पुलवामा हल्ल्याला मदत करणारे गुन्हेगार वाचणार नाहीत : अरुण जेटली
व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला, सीसीएसच्या बैठकीत निर्णय झाल्याची अरुण जेटली यांची माहिती
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील मोबाईल इंटरनेट सेवा खंडित
सीसीएसची बैठक संपली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सुमारे 55 मिनिटांची बैठक
सीसीएसची बैठक संपली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सुमारे 55 मिनिटांची बैठक
सीसीएसची बैठक संपली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सुमारे 55 मिनिटांची बैठक
बारामती : संपूर्ण देश पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या पाठीशी आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. पण देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपयश समोर आलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. या हल्ल्यामागे शेजारच्या राष्ट्राचा हात असल्याची शक्यताही पवारांनी वर्तवली आहे.
तसंच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचंही ते म्हणाले.
बारामती : संपूर्ण देश पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या पाठीशी आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. पण देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपयश समोर आलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. या हल्ल्यामागे शेजारच्या राष्ट्राचा हात असल्याची शक्यताही पवारांनी वर्तवली आहे.
तसंच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचंही ते म्हणाले.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात सीसीएसची बैठक, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाल अजित डोभाल, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण तसंच तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित

पार्श्वभूमी

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 37 जवान शहीद झाले असून पाच जवान जखमी आहेत. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरच्या अनेक परिसरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने कट रचला
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आदिल अहमद डार नावाच्या अतिरेक्याने सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा कट रचला होता. आदिल अहमद डार हा पुलवामाच्या काकापोराचा रहिवासी आहे. सीआरपीएफच्या 54व्या बटालियनच्या जवानांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. अवंतीपोराच्या गरीपोराजवळ गुरुवारी संध्याकाळी सीआरपीएफ जवानांना हल्ला झाला. आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डार 2018 मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेत सामील झाला होता.

स्फोटकांनी भरलेल्या गाडीची बसला टक्कर
स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन आलेला जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी आदिलने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यातील बसला टक्कर दिली. ज्या बसला अतिरेक्यांनी टक्कर मारली, त्यात 39 जवान होते, असं म्हटलं जात आहे. हल्ल्यानंतर जवानांना तातडीने श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या गाडीने जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यात सुमारे 200 किलो स्फोटकं होती.

सीआरपीएफच्या ताफ्यात 70 गाड्या
हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. सीआरपीएफचा हा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात होता आणि दोन हजारांपेक्षा जास्त जवान ताफ्यात होते. सीआरपीएफच्या ज्या ताफ्यावर हल्ला केला, त्यात 70 वाहनं होती. त्यापैकी एक गाडी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. जम्मू-काश्मीर पोलिस तपास करत असल्याचं सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक जुल्फिकार हसन यांनी सांगितलं.

गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टकडे दुर्लक्ष
या हल्ल्याबाबत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. हल्ल्याआधी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती. बैठकीत गुप्तचर यंत्रणेनी जवानांना सतर्क करत हल्ल्याचा संशय व्यक्त केला होता. तरीही सुरक्षारक्षकांनी ही माहिती गांभीर्याने घेतली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी सीआरपीएफसह अनेक सुरक्षा दलांवर कारमधून बॉम्बस्फोट करण्यात येईल असा इशारा देत तयार राहण्याचे राहा, असं सांगितलं. पुलवामात अशाचप्रकारे हल्ला झाला.

गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलाच्या बैठकीत दोन पर्याय सुचवण्यात आले. पहिला म्हणजे ताफा जाण्याआधी महामार्गावरील गाड्यांची तपासणी करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे ताफा रात्री उशिरा घेऊन जाण्यास सांगितलं होतं. ताफा रात्रीचा निघण्याचं कारण म्हणजे त्यावेळी तिथे कमी रहदारी असते, त्यावेळी त्यांची तपासणी करणं सोपं होईल. मात्र सुरक्षा यंत्रणांच्या या अलर्टकडे सुरक्षा दलाने गांभीर्याने लक्ष दिलं नाही.

उरीमधील हल्ल्यात 19 जवानांना वीरमरण
याआधी दहशतवाद्यांनी सप्टेंबर 2016 मध्ये उरीमध्ये हल्ला केला होता. 18 सप्टेंबर 2016 रोजी अतिरेक्यांनी सैन्यच्या कॅम्पवर हल्ला केला, ज्यात 19 जवान शहीद झाले होते. यानंतर हल्ल्या बदला सर्जिकल स्ट्राईकने घेण्यात आला.

देशात संताप, तर आज सीसीसीची बैठक
हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या भ्याड हल्ल्यासाठी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी नागरिक करत आहेत. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या हल्ल्याबाबत गृहमंत्रालयाने पीएमओला एक अहवाल सादर केला असून, पाकिस्तानमधून मसूद अजहरने हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे. एनआयए, एनएसजी आणि सीएफएसएलचं विशेष पथक आज घटनास्थळी जाणार आहे. सकाळी सव्वा नऊ वाजता कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीची बैठक होणार आहे. यामध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सोबतच गृहमंत्री राजनाथ सिंह सकाळी अधिकाऱ्यांसह श्रीनगर जाणार आहेत.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही." दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर सर्व भारतीयांनी या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना व्यक्त केली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सर्व राजकीय नेत्यांनीदेखील घटनेचा निषेध केला, परंतु घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र व्यक्त झाले नव्हते. खूप उशिरा मोदींनी ट्वीट करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत."

बॉलिवूडकरांचा संताप
बॉलिवूड सेलिब्रेटींनीदेखील या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेता रितेश देशमुख, बॉलिवडूचा सिंघम अजय देवगण,अभिषेक बच्चन, दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री गुल पनांग यांनी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

संबधित बातम्या

Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.