रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील 'मच्छली'चं निधन
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 07:20 PM (IST)
1
पार्कमधील अमा घाट परिसरात सध्या तिचं वास्तव्य होतं. देश-विदेशातील फोटोग्राफर्सना 'मछली'ला कॅमेराबद्ध करण्याचा मोह होता.
2
मछलीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीमही या पार्कमध्ये ठेवण्यात आली होती. आज सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी तिला मृत घोषित करण्यात आलं.
3
गेल्या दहा वर्षांत मछलीमुळे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी 50 ते 60 कोटी रुपयांचं उत्पन्नही मिळत होतं. यासाठी तिला 2009 साली सन्मानितही करण्यात आलं होतं.
4
राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वाघीण 'मछली'चा मृत्यू झाला आहे. तिला T-16 म्हणूनही ओळखलं जात होतं.
5
वाघांचं सरासरी आयुर्मान 15 वर्षांपर्यंत असतं. पण मछलीने त्यावर मात करत 19 वर्षांचा पल्ला गाठला होता.
6
19 वर्षांची ही वाघीण गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तसंच तिनं गेल्या पाच दिवसांपासून खाणं-पिणं सोडलं होतं.