LIVE एकीचं बळ ही देशाची ताकद : मोदी
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला :
नोटाबंदीमुळे काळा पैसा बाजारात आला, 3 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले - मोदी
कधीच आयकर भरला नव्हता अशा 1 लाख लोकांनी कर भरला - मोदी
3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उघड झालं, त्यातील पावणे दोन लाख कंपन्या रद्द केल्या - मोदी
आंदोलनात सरकारी संपत्तीचं नुकसान केलं जातं,ती सरकारची नाही, जनतेची संपत्ती आहे : मोदी
आस्थेच्या नावाने हिंसेचा मार्ग पत्करु नका, आंदोलनात देशाच्या संपत्तीचा नाश करु नका- मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील- लाल किल्ल्यावरून मोदी
देशातील तरुण रोजगार मिळवणारा नव्हे, रोजगार देणारा असावा यासाठी काम सुरु
शेतात पाणी पोहोचवण्यासाठी 21 योजना पूर्ण, 50 योजना लवकरच पूर्ण होतील, एकूण 99 योजना : मोदी
शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं, सरकारने 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळकांनी म्हटलं होतं, आता सुराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं नागरिकांनी म्हणायला हवं - मोदी
न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से - मोदी
9 महिन्यात आम्ही मंगळावर पोहोचू शकतोय, पण 72 किमीचा रेल्वे मार्ग 42 वर्ष रखडून पडलाय-मोदी
'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से' : पंतप्रधान मोदी
दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत : पंतप्रधान मोदी
प्रशासनामध्ये सुरळीतता आणण्याचं काम सरकारने केलं : पंतप्रधान मोदी
21 व्या शतकात जन्म घेणाऱ्यांसाठी 2018 हे वर्ष निर्णायक असेल. युवकांनो देशाच्या विकासात योगदान द्या, देश तुम्हाला निमंत्रित करतोय : पंतप्रधान मोदी
देशाच्या विकासात सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा
सर्जिकल स्ट्राईकवेळी भारताची ताकद सर्वांनी मान्य केली. सरकारने जवानांसाठी काही केलं, तर देशासाठी लढण्यासाठी त्यांचं मनोबल आणखी वाढतं. वन रँक वन पेन्शनचा प्रश्न सरकारने मार्गी लावला.
गरिबांना लुटून स्वतःची तिजोरी भरणाऱ्यांची आज झोप उडाली आहे
आज दुप्पट वेगाने रस्ते, रेल्वे वाढत आहे, देश बदलतोय ते सर्वांना दिसतंय : मोदी
सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखाधारी मोहन ही आपली संस्कृती- लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी.
सामूहिक शक्तीमुळे देश स्वतंत्र झाला, एकीचं महत्व सर्वांना माहित आहे. सामूहिक शक्ती, एकीचं बळ ही आपली ताकद, देशात ना कोणी छोटा, ना कोणी मोठा, सर्व समान आहेत.
न्यू इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जायचंय. 21 व्या शतकात जन्म घेणाऱ्यांसाठी 2018 हे वर्ष निर्णायक असेल. न्यू इंडिया सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि जगभरात भारताचा दबदबा असणारा असेल
यूपीत रुग्णालयात चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी मोदींकडून शोक व्यक्त
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याचं हे 125 वं वर्ष आहे : पंतप्रधान मोदी
पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -