Live : BREAKING- बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा
#राम_रहीमचा_फैसला : आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम केलं, आम्हाला माफ करा: राम रहीमच्या वकिलांची मागणी
#राम_रहीमचा_फैसला : राम रहीम समाजसेवक आहे, त्यांना कमीत कमी शिक्षा द्या – वकिलांची मागणी
#राम_रहीमचा_फैसला : कोर्ट रुममध्ये बाबा राम रहीम हात जोडून उभा, न्यायाधीशांकडे दयेची याचना
#राम_रहीमचा_फैसला : कोर्टरुममध्ये 2 जण सीबीआयचे, 3 जण बचाव पक्षाचे, 2 स्टाफ सदस्य आणि न्यायाधीश जगदीप सिंह उपस्थित
राम रहीमचा फैसला – न्यायाधीश जगदीप सिंग यांच्याकडून दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ
बाबा राम रहीमला रोहतकच्या कारागृहातच आज दुपारी शिक्षा सुनावली जाणार आहे.. यासाठी सीबीआय न्यायालयातून न्यायाधीश जगदीप सिंग यांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतक परिसरात नेलं जातंय. .. रोहतक शहराबाहेर असलेल्या हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर उतरेल आणि तिथून न्यायामृर्ती कारागृहात जातील.. जिथे राम रहीमला शिक्षा सुनावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीय. राम रहीमला 7 ते 10 वर्षांचा कारावास होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जातेय.
सीबीआय कोर्टातून न्यायाधीश जगदीप सिंग विशेष हेलिकॉप्टरने रोहतकला रवाना. रोहतक शहराबाहेर असलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरणार. तिथून न्यायमूर्ती कारागृहात जाणार
बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या बाबा राम रहीमला दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. बाबा राम रहीमला 2002 च्या साध्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव न्यायाधीश शिक्षा सुनावण्यासाठी स्वतः रोहतक कारागृहात जाणार आहेत. राम रहीमला कोणती शिक्षा मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिक्षेच्या सुनावणीनंतर जर पुन्हा समर्थकांनी हिंसा सुरु केली, तर थेट त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश राज्य सरकारनं पोलिसांना दिले आहेत.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.