बॉलिवूड स्टार्सनीही घेतला सरोगसीचा आधार
अभिनेत्री सुस्मीता सेननं आपल्या दोन्ही मुलींना दत्तक घेतलं आहे.
फॅशन डिझायनर हसीना जेठमलानी हीने आपल्या जूळ्या मुलांसाठी या पद्धतीचा वापर केला होता.
फराह खाननेही आपल्या तीन मुलांसाठी सरोगसीचा आधार घेतला होता.
सोहेल खाननेही आपला मुलगा योहान खानसाठी सरोगसीचा वापर केला होता.
मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद राव खान सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. अमीर खानने त्याच्या जन्मानंतर विज्ञानाचे आभार मानले होते.
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा तिसरा मुलगा अब्राहम सरोगसीमुळे जन्माला आला आहे.
अभिनेता तुषार कपूर काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून बाप बनला आहे. आपल्या मुलाचं नाव त्याने लक्ष्य ठेवलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सरोगसी विधेयकाचा मसूदा बनवला आहे. आज या विधेयकावर संसदेत चर्चा होणार आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींंनी या सरोगसीच्या माध्यमातून पालकत्वाचा अनुभव घेतला आहे.
अभिनेता सलमान खानची बहिण अर्पितालाही दत्तक घेतलं होतं.
रवीना टंडनने 21व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेेतलं होतं. यापैकी एका मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनीही एका मुलीला दत्तक घेतलं होतं.