रौप्यराणी पी व्ही सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव
अभिनेता सलमान खनने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहिर केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहैदराबाद बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी सिंधूला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. ही कार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते 20 ऑगस्टला दिली जाणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सिंधूला तिच्या आवडीची गाडी देण्याचं जाहिर केलं आहे.
हरियाणा सरकारने 50 लाखांचं बक्षिस सिंधूला दिलं आहे.
पी. व्ही. सिंधूला भारतीय फुटबॉल फेडरेशनकडून 50 लाख रुपयांचं बक्षिस जाहिर करण्यात आलं आहे.
भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून 50 लाख रूपयांचं इनाम या रौप्यराणीला देण्यात आलं आहे.
मध्य प्रदेश सरकारने 50 लाख रुपयांचं बक्षिस सिंधूला दिलं आहे.
पी व्ही सिंधूला दिल्ली सरकारकडून 2 कोटी रुपयांचं बक्षिस जाहिर करण्यात आलं आहे.
रौप्यराणी पी व्ही सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला आहे. तेलंगाणा सरकारकडून एक कोटी रुपयांचं इनाम आणि भूखंड सिंधूला भेट केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -