7 वा वेतन आयोगः पुढील महिन्यापासून वाढीव वेतन
नव्या वेतनात मूळ वेतन 23.5 टक्के वाढवलं आहे, तर पेंशन 24 टक्के वाढवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App90 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडीच लाख रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. मात्र एवढ्या वेतनवाढीनंतरही कर्मचारी नाराज आहेत.
46 हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 1 लाख 18 हजार 500 रुपये असेल. तर 80 हजार रुपये वेतन असणान मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 2 लाख 25 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे.
ज्यांचं वेतन 13 हजार 500 रुपये आहे, त्यांना आता 35 हजार 400 रुपये मिळतील. 21 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 56 हजार 100 रुपयांपर्यंत जाईल.
7 वा वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार किमान वेतन 18 हजार रुपये असेल. म्हणजेच ज्यांचं वेतन 7 हजार रुपये आहे, त्यांचं वेतन आता 18 हजार रुपये होईल.
सरकारने 29 जून रोजी 7 व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.5 टक्के वाढ केली होती. त्यानंतर कर्मचारी आता अंमलबजावणीची वाट पाहत आहेत.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारने 25 जुलैला जारी केलेल्या अधिसुचनेनुसार ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -