Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज
दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या तेलंगणात चंद्रशेखर राव सत्ता कायम राखणार असल्याचं दिसत आहे. तेलंगणात काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाला अपशय आल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थान आपली परंपरा कायम राखणार असल्याचंही एबीपी न्यूज, लोकनीती आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं राज्य खालसा होणार असून, काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत.
एबीपी न्यूज, लोकनीती आणि सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार 15 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात यंदा सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस भाजपच्या हातून सत्ता खेचण्यात यशस्वी ठरणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
सलग तीन टर्म सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये मात्र यंदाही भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरण्याची चिन्हं आहेत. अजित जोगी आणि मायावती यांच्या आघाडीचा फटका काँग्रेसला बसल्याचं पोलमध्ये दिसत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -