बाळासाहेबांचा सर्वात मोठा फॅन बाईकने अयोध्येत
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2018 03:32 PM (IST)
1
जिथे-जिथे बाळासाहेबांची सभा होत असे, तिथे-तिथे मोहन यादव उपस्थित राहत असत.
2
एका अपघातात पायाला जबर दुखापत झाल्यानंतरही निर्धारात गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांनी खंड पडू दिला नाही. आता आयोध्या दौऱ्यासाठीही गेल्या दहा दिवसांपासून बाईकने प्रवास करत ते अयोध्येत पोहोचले.
3
विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी स्वतः वीस हजार रुपयांची पदरमोड करुन ते अयोध्येत पोहोचले. त्यामुळे त्यांच्या या निष्ठेची, पक्षप्रेमाची परतफेड किमान त्यांचा हरवलेला रोजगार परत मिळवून देऊन पक्ष करणार का हे बघायला हवे.
4
मोहन यादव यांची बाईकही भगव्या रंगाची आहे. त्यावर केशरी रंगाची फुलं लावल्याने अधिक उठाव आला आहे. बाईकवरही त्यांनी विविध घोषणा लिहिल्या आहेत.
5
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी एक 'बाळासाहेब प्रेमी' शिवसैनिक मोटारसायकलने प्रवास करत अयोध्येत दाखल झाला आहे.