रोजगार, भ्रष्टाचार, परदेश दौरे आणि रघुराम राजन.. मोदींच्या मुलाखतीतील महत्वाचे 10 मुद्दे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'रघुराम राजन यांनीही देशाची सेवा केली. त्यांचंही देशावर प्रेम आहे. त्यामुळे अशा प्रकारचे भाष्य करणं अयोग्य आहे.'
'यंत्रणेपेक्षा आपण मोठे आहोत, असं कोणाला वाटत असेल तर ते अयोग्य आहे.'
मोदींनी सुब्रमण्यम स्वामींनाही टोला लगावला. रघुराम राजन यांच्या बाबतीत जे विधान केलं ते अयोग्य होतं, प्रसिद्धीसाठी असे कृत्य करुन काहीही मिळत नाही, असं मोदी म्हणाले.
'ऑगस्टा प्रकरणाची चौकशी चालू आहे. तपास संस्था त्यांच्या मार्गाने चौकशी करतील. निकाल काय येतो त्याकडे लक्ष आहे.'
'ऑगस्टा वेस्टलँड सारखे घोटाळे करणारे लोक भ्रष्टाचारात तज्ञ आहेत. त्यांच्याकडं चूक गोष्टी करण्याची कला आहे.'
'भारताचे 800 मिलीयन लोक 35 वयोगटाच्या खाली आहेत. त्यामुळे नोकरीच्या संधी निर्माण करणं आव्हान आहे. उत्पादन, सेवा, पायाभूत सुविधा या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.'
देशाच्या एकाग्रतेला बळ देणाऱ्या गोष्टींवरच आपण जास्त भर द्यावा. तरच देशाचं उज्ज्वल भविष्य बनवता येईल.
मी वेगवेगळ्या देशांच्या अध्यक्षांना भेटलो नसतो तर भारताचा पंतप्रधान कोण आहे, हे त्यांना समजलं नसतं. मी कुठल्या राजकीय कुटुंबाचा सदस्य नव्हतो, त्यामुळं हे गरजेचं होतं.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला फेरबदल आहे, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बदल होणार का?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -