डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुनकिन है
विशेष म्हणजे, दाऊदचे राहणीमान जाणून घेण्यासाठी आनंदपालला दाऊदवरील पुस्तके वाचण्याचा छंद आहे.
नुकतेच आनंदपालला पकडण्यासाठी पोलिसांच्या स्पेशल टीमने ग्वाल्हेरमधील एका घरावर छापा टाकला होता. यावेळी झालेल्या चकमकीत आनंदपालचा राईट हँड पंकज गुप्ता याला ठार झाला होता. तर आनंदपालला इथून निसटण्यात यश आले.
राजस्थानच्या चंबळ खोऱ्यातील जवळपास तीन हजार पोलीस, 21 पोलीस निरिक्षक एका डॉनच्या शोधात आहेत. पण हा डॉन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहज निसटतो आहे. या डॉनची दहशत सध्या संपूर्ण उत्तर भारतात आहे.
पोलीस कोठडीतून फरार झालेला आनंदपाल हा गुंड गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना सहज चकवा देतो आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, आणि उत्तरप्रदेशचे पोलीस आनंदपालच्या शोधात आहे. पण तो कुठे लपलाय याचा ठिकाणा पोलिसांना अद्याप लागलेला नाही.
आनंदपालने ३८ वर्ष वयात राजस्थानमधील हिस्ट्रीशिटर आणि काही स्थानिक गुंडांचा खात्मा केला. यानंतर त्याने एक स्वत: ची गँग बनवली, अन राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने २००६ साली केलेल्या जीवनराम गोदारच्या याच्या हात्याकांड सर्वात जास्त चर्चेला गेला. या हत्याकांडामुळे तो पोलिसांच्या हिट लिस्टवर आला. २०१२ साली त्याला या हत्याकांडप्रकरणी अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून एक बुलेट प्रुफ जॅकेट आणि एके ४७ जप्त करण्यात आली. पण ३ सप्टेंबर २०१५ रोजी पोलिसांवर हल्ला करून तो करागृहातून निसटला.
आनंदपालाचा जीवनप्रवास संजय दत्तच्या 'वास्तव' या चित्रपटाशी साधर्म्य सांगतो. या चित्रपटात संजय दत्त ज्याप्रमाणे गुन्हेगारीच्या दलदलीत खोलवर रुतत जातो. त्याचप्रमाणे, आंनदपालही गुन्हेगीरी जगतात आला, आणि आज मोठा डॉन म्हणून नावारुपाला आला आहे.
उच्चशिक्षित आनंदपालला शिक्षक बनण्याची इच्छा होती. जेव्हा त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही, त्यानंतर त्याने राजकारणात पदार्पण केले. आनंदपालने पंचायत समितीची निवडणूक ही लढली होती. पण या निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
देशाचा मोस्ट वॅन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याला आनंदपाल आपला हिरो मानतो. त्याच्याच प्रमाणे तो वागण्याचा तो सदैव प्रयत्न करतो.
राजस्थानच्या नागौर तालुक्यातील आनंदपालची इतरांप्रमाणेच आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. पण राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्याने त्याचे शत्रू वाढल्यामुळेच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्यास प्रवृत्त झाला. एका हत्येद्वारे हा द्वारे तो या दलदलीत ढकलला गेला. त्यानंतर पोलीस, शत्रू, आणि गँगवार यांमुळे तो उत्तर भारतात डॉन म्हणून उदयाला आला.