नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा फोटो वेगानं व्हायरल होत आहे. या फोटोसह दावा केला जातोय की हा फोटो 26 जानेवारीचा लाल किल्ल्यावर झालेल्या परेडचा आहे.  


विश्वास न्यूजला आपल्या पडताळणीत व्हायरल फोटोबाबत केला जाणारा दावा चुकीचा असल्याचं आढळलं. व्हायरल फोटो एआयद्वारे बनवण्यात आला आहे.  


काय व्हायरल होतंय?


फेसबुक यूजर अंजली चौहान हिनं व्हायरल फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं की, "नरेंद्र मोदी, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर  हे लाल किल्ल्यावर 26 जानेवारीची परेड पाहतानाचा फोटो" 
 


पोस्टच्या अर्काईव्ह लिंक इथं पाहा 





पडताळणी 


व्हायरल पोस्टचं सत्य जाणण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डस वापरून सर्च केलं. यामध्ये या दाव्याची पुष्टी करणारी विश्वसनीय बातमी आढळली नाही. त्यामुळं गुगल रिव्हर्स इमेजची मदत घेऊन सर्च केलं. मात्र, या दाव्याची पुष्टी करणारी माहिती मिळाली नाही.  


फोटोला सूक्ष्मपणे पाहिलं असता आम्हाला फोटोत काही त्रुटी आढळून आल्या. धोनी आणि तेंडुलकरचे डोळे व्यवस्थित नसल्याचं दिसून आलं. तर, मोदींच्या अंगठ्याची रचना देखील योग्य नाही हे दिसलं.  


आम्ही पडताळणी पुढच्या टप्प्यावर जाऊन केली.एआयच्या मदतीनं मल्टीमिडियाची पडताळणी करणाऱ्या टूल्सच्या मदतीनं सर्च केलं. आम्ही हाइव मॉडरेशनच्या मदतीनं फोटो सर्च केला. या टुलनं  98 टक्के फोटो एआय जनरेटेड असल्याचं सांगितलं.  




आम्ही आणखी एका टूलची मदत घेत फोटो सर्च केला. आम्ही डी कॉपीच्या मदतीनं फोटो शोधला. या टूलनं फोटो 92 टक्के एआयनिर्मित असल्याचं सांगितलं.  





आम्ही एआय प्रोजेक्टवर काम कऱणाऱ्या एआय तज्ज्ञ अंश मेहरा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी फोटो एआय टूल्सच्या मदतीनं तयार केल्याचं सांगितलं.


देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. हा दिवस देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. देशाच्या राष्ट्रपती कर्तव्यपथावर तिरंगा फडकवतात. त्यानंतर परेडचं आयोजन केलं जातं. तर, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. 


शेवटी आम्ही या फोटोला चुकीच्या दाव्यासह शेअर करणाऱ्या यूजरच्या अकाऊंटची पडताळणी केली. आम्हाला या यूजरचे चार हजारांहून अधिक मित्र असल्याचं आढळलं. 


 
निष्कर्ष : विश्वास न्यूजला त्यांच्या पडताळणीत नरेंद्र मोदी, धोनी आणि सचिन तेंडुलकरचा  26 जानेवारीच्या कार्यक्रमाचा फोटो चुकीच्या दाव्यासह शेअर केला जातोय. तो दावा चुकीचा आहे. फोटो एआयद्वारे तयार करण्यात आलेला आहे.  



Claim Review : मोदी, धोनी, सचिन तेंडुलकरचा 26 जानेवारीची परेड पाहतानाचा फोटो


Claimed By :FB User - अंजली चौहान 


Fact Check : असत्य (फेक)


[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]