फॅक्ट चेक |
दावा काय आहे?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागल्याचा दावा करण्यात आला. त्या पोस्टरवर 'फिर आएंगे केजरीवाल' असं लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळतं. हे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपचे घोषवाक्य आहे.
या फोटोला काही यूजर्सनी अरविंद केजरीवाल यांचं थट्टा करत शेअर केलं आहे. कारण, 2024 मध्ये दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल तिहारमध्ये बंद होते. 13 सप्टेंबर 2024 जामीन मिळाल्यानं ते तुरुंगाबाहेर आले.
भाजपच्या महिला मोर्चाच्या पश्चिम बंगालच्या सोशल मिडिया प्रभारी लक्ष्मी सिंह यांनी केजरीवाल यांची थट्टा करत फोटो शेअर केला आहे. या सारख्या इतर पोस्टच्या अर्काईव्ह लिंक इथं, इथं आणि इथं पाहू शकता.
दरम्यान, आम्हाला असं आढळून आलं की जेलच्य प्रवेशद्वाराच्या फोटोला एडिट करुन त्यात केजरीवालांचं पोस्टर जोडण्यात आलं होतं. केजरीवालांसंदर्भातील एडिटेड फोटो थट्टा करण्यासाठी बनवण्यात आल्याचं समोर आलं.
सत्य काय?
व्हायरल फोटोला रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पडताळण्यात आलं, 2018 मध्ये द कारवा यांच्याकडून प्रकाशित झालेला एक लेख उपलब्ध झाला त्यात तिहार जेलमध्ये कारागृहात असताना होणाऱ्या हिसेंचा उल्लेख होता. लेखात तोच फोटो होता, मात्र त्या फोटोत अरविंद केजरीवाल यांचं पोस्टर नव्हतं. कॅप्शनमध्ये फोटोचं क्रेडिट गेटी इमेजेस दिलं होतं.
यावरुन पुढं तपास केला असता आम्हाला गेटी इमेजवर मूळ फोटो मिळाला. 4 ऑक्टोबर 2006 चा फोटो असून तो इंडिया टुडेचे पत्रकार अरिजीत सेन यांनी काढला होता. यावरुन स्पष्ट होतं की 2012 मध्ये आपची स्थापना होण्यापूर्वी खूप वर्षं अगोदर तो फोटा काढला होता. त्यामध्ये अरविंद केजरीवालांच्या पोस्टरचा समावेश नव्हता.
लॉजिकली फॅक्टसच्या हे देखील निदर्शनास आलं की दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपरोधिकपणे हा व्हायरल फोटो मीम म्हणून शेअर केला गेला होता. त्या अकाऊंटमध्ये त्यांच्या बायकोमध्ये उपरोधिक म्हणजे व्यंगात्मक असा उल्ले आहे. त्यात उल्लेख असलेल्या हॅशटॅगवरुन ते एक मीम असल्याचं स्पष्ट होतं. मीम संदर्भातील पोस्ट तुम्ही इथं आणि इथं पाहू शकता. मूळ फोटोत केजरीवालांचा फोटो नाही.
याशिवाय तिहारच्या जेलबाहेर अरविंद केजरीवाल यांचं पोस्टर असणारा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आमच्या निदर्शनास आल्यानुसार तो फोटो देखील एडिट करण्यात आला होता. अरविंद केजरीवाल यांची थट्टा करण्याच्या हेतूनं तो तयार करण्यात आला होता. ळ फोटोचा एक भाग 2021 मध्ये द हिंदूतील एका लेखात प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये केजरीवालांचा फोटो नव्हता.
निर्णय
तिहार जेलच्या प्रवेशद्वाराचा फोटो 2006 मधील आहे. एका फाईल फोटोला एडिट करुन त्यात अरविंद केजरीवाल यांचं पोस्टर जोडण्यात आलं आहे.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा लॉजिकली फॅक्टसवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]