मुंबई : सोशल मीडियावर क्षणाक्षणआला ट्रेंड अर्थात सोप्या शब्दांत सांगावं तर चर्चेत असणारे विषय बदलत असतात. अशातच सध्या कलाविश्वाशी संबंधित एका मुद्द्यानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यातूनच ट्रेंडमध्ये आला आहे, Zombie Reddy. 


आता तुम्हीही म्हणाल हे नेमकं काय प्रकरण? तर, हा एक चित्रपट असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी हा चित्रपट आता सज्ज झाला असून, त्यासंदर्भातील अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. प्रशांत वर्माच्या या थरारपटात तेजा सज्जा, दक्षा नगरकर, आणि आनंदी हे कलाकार झळकणार आहेत. 5 फेब्रुवारीलाच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल माध्यमातील प्रेक्षकांच्याही भेटीला आला आहे. 


Corona मुळं क्वारंटाईन असणाऱ्या मिलिंद सोमणला पीपीई किट घालून भेटायला आलं तरी कोण? 


एएचए या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. प्रशांत वर्मा दिग्दर्शित या तेलुगूभाषी चित्रपटाची निर्मिती राज शेखर वर्मा यांनी केली आहे. तेलुगू भाषेतील पहिला झोम्बीपट म्हणूनही या चित्रपटाकडे पाहिलं जातं. हा चित्रपट त्यात असणाऱ्या तांत्रिक बारकाव्यांमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. 






नुकताच डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्य म्हणजे फक्त तेलुगू प्रेक्षकांपुरताच सीनीत नसून, हा चित्रपट विविधभाषी प्रेक्षकांकडूनही पाहिला जात आहे.