Zareen Khan : बॉलिवूडमधील अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. झरीनच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यानं झरीनच्या आईला रूग्णायलयामध्ये दाखल करावं लागलं. सध्या तिच्या आईवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. झरीननं तिच्या चाहत्यांकडे तिच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. 


झरीननं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिनं लिहिले, 'माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आणि तिला काल (26 एप्रिल) रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती सध्या आयसीयूमध्ये आहे. तुम्हाला सर्वांना मी विनंती करते की माझ्या आईसाठी तुम्ही प्रार्थना करा.' झरीन सोशल मीडियावर तिच्या आई आणि वडिलांचे फोटो नेहमी शेअर करत असते. 






झरीनंच्या आईला गेल्या वर्षी देखील रूग्णालयात  दाखल करावे लागले. पण त्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण झरीननं चाहत्यांसोबत शेअर केले नव्हते. लवकरच झरीनचं  'ईद हो जाएगी' हे गाणं प्रदर्शित होणार आहे. या गाण्यामध्ये झरीनसोबतच  उमर रियाज देखील थिरकताना दिसणार आहे. वीर या चित्रपटामधून झरीननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये झरीनसोबतच अभिनेता सलमान खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली. 


महत्वाच्या बातम्या :