Zanai Bhosle Insta Post After Asha Bhosle Demise: शतकानुशतके भारतीयांच्या मनावर आपल्या आवाजाचं गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात मोठी पोकळी तयार झालीय. रविवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाजींना अखेरचा निरोप देताना साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. विशेषतः त्यांची नात जनाई भोसलेला (Janai Bhosle) आजीला शेवटचं बघणं फार जड गेलं. आजीच्या आठवणींनी जनाई व्याकूळ झाली होती. आशाजींना अखेरचा निरोप दिल्यानंतर जनीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.आजी-नातीचं हे नातं अतिशय खास आणि जिव्हाळ्याचं होतं. (Asha Bhosle Passed Away)
जनाई भोसले यांची आजीसाठी खास पोस्ट
जनाई भोसलेने आजीच्या निधनानंतर इंस्टावर स्टोरी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिलं, “भावनांनी पूर्णपणे भरून गेले आहे, वेळ मिळेल तेव्हा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण मला इतकंच सांगायचं आहे की आज इतक्या लोकांनी तिला मान दिला, सन्मान केला आणि तिच्यावर अफाट प्रेम व्यक्त केलं.तुमचे मनापासून आभार. ती खरोखरच या प्रेमास पात्र होती. मला जाणवत राहतं की ती आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतील आणि वरून हे सगळं तिने पाहिलं आहे.” असं जनाईने लिहिलं. अंत्यविधीचा फोटो पोस्ट करत तिने हे लिहिलंय. ‘गुडबाय माय लव्ह, लव्ह ऑफ माय लाइफ’ असं तिनं लिहित आजीला अखेरचा निरोप दिला.आजीच्या निधनाने जनाई पूर्णपणे खचली असून ती खूपच भावूक झाल्याचं दिसत आहे.
कोण आहे जनाई भोसले?
जनाई भोसले ही आशा भोसले यांच्या धाकट्या मुलाची म्हणजेच आनंद भोसले यांची मुलगी आहे. 2002 साली मुंबईत तिचा जन्म झाला. तिने स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित ‘इन्स्टिट्यूट ले रोजी’मधून शिक्षण पूर्ण केलं आहे. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत जनाईने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मधुर आवाजाने त्या रसिकांची मनं जिंकताना दिसतेय.
हेही वाचा:
