Who Is Zanai Bhosle:भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळतोय. (Asha Bhosle Passed Away) 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती त्यांच्या नात जनाई भोसले (Zanai Bhosle) हिने सोशल मीडियावरून दिली होती. थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं तिने सांगितलं होतं. दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आशा भोसले यांच्या आजी नातीच्या नात्याची चर्चा असताना जाणून घेऊ त्यांची सख्खी नात जनाई भोसले कोण आहे? ती काय करते? (Who is Asha BHosle Grand doughter Zanai Bhosle)
कोण आहे जनाई भोसले?
जनाई भोसले ही आशा भोसले यांच्या धाकट्या मुलाची म्हणजेच आनंद भोसले यांची मुलगी आहे. 2002 साली मुंबईत तिचा जन्म झाला. तिने स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित ‘इन्स्टिट्यूट ले रोजी’मधून शिक्षण पूर्ण केलं आहे. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत जनाईने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मधुर आवाजाने त्या रसिकांची मनं जिंकताना दिसतेय.
संगीत आणि सोशल मीडियावर लोकप्रियता
2020 साली जनाईने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं, यावर तिने अनेक म्युझिक व्हिडिओ सादर केले. गेल्या वर्षी त्यांचं ‘केहंदी है’ हे गाणं विशेष गाजलं. त्यांच्या गायनाचं कौतुक स्वतः आशा भोसले यांनीही केलं होतं. तसेच सलमान खाननेही जनाईच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे.
अभिनय क्षेत्रात पदार्पण
जनाई आता अभिनयाच्या दुनियेतही पाऊल ठेवत आहे. त्या लवकरच ‘The Pride of Bharat - Chhatrapati Shivaji Maharaj’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंग करत आहेत. या सिनेमात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी राणी साई भोसले यांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात मुख्य भूमिका रिषभ शेट्टी साकारत आहेत.
केवळ संगीत आणि अभिनयच नव्हे, तर व्यवसाय क्षेत्रातही जनाईने आपली छाप पाडली आहे. अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी ‘iAzure’ नावाने बांद्र्यात ॲपल रिसेलर स्टोअर सुरू केलं. या स्टोअरच्या उद्घाटनाला अंजली तेंडूलकर आणि सारा तेंडूलकर उपस्थित होत्या.
आजीशी खास नातं
जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय असून इंस्टाग्रामवर तिला लाखो फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा आपल्या आजी आशा भोसले यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते .आजी-नातीचं हे नातं अतिशय खास आणि जिव्हाळ्याचं होतं हे तिच्या प्रत्येक पोस्टमधून जाणवतं.
श्रद्धा कपूर अन् आशा भोसले याचं नातं
फारच कमी लोकांना ठाऊक आहे की, श्रद्धा कपूर आणि आशा भोसले यांच्यात आजी आणि नातीचं नातं आहे. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापूरे कपूर आहे. श्रद्धाच्या आईचे वडील म्हणजे, श्रद्धाचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे. जे दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे आणि भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांचे मामेभाऊ लागायचे. याच नात्यानं आशाताई श्रद्धाच्या आजी लागतात. श्रद्धानं कित्येकत्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आशाताईंसोबतचे गोड क्षण शेअर केले आहेत.
